प्लॅस्टिकपासून या दांपत्याने साकारला आपला आशियाना


दोन वर्षांपुर्वी एका बैलाच्या पोटातील कचरा ऑपरेशन करून काढण्यात आलेल्या व्हिडीओने हैद्राबादमधील प्रशांत लिंगम आणि त्यांची पत्नी अरूणाला विचार करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांनी असे तंत्र शोधले की, प्लॅस्टिकच्या कचऱ्याचा वापर हा घर आणि फूटपाथ बनवण्यासाठी करता येऊ लागला.

प्लॅस्टिकच्या कचऱ्याला रिसायकलकरून त्याचा वापर घर आणि अन्य स्ट्रक्चर बनवण्यासाठी ते करू लागले. पती-पत्नी दोघांनाही घर बनवण्याचा मोठा अनुभव आहे. 2017 मध्ये त्यांनी हा निर्णय घेतला. त्यांनी सांगितले की, तो व्हिडीओ बघून आम्ही खूप घाबरलो. तेव्हा आम्ही या विषयावर रिसर्च करण्यास सुरूवात केली.


प्लॅवूडच्या जागी प्लॅस्टिक प्लँक (फळी)
देशातील वाढते इंफ्रास्ट्रक्चर बघून त्यांनी प्लॅस्टिकपासून घर बनवण्याचा निर्णय घेतला. प्लॅवूडच्या जागी आम्ही प्लॅस्टिकच्या प्लँकचा वापर केला. ते दुधाच्या पॉकिटापासून बनले आहे. याचा वापर फर्निचर, टॉयलेट, बंच आणि बस शेल्टर बनवण्यासाठी केला जाऊ शकतो. त्यांनी सांगितले की, टुथब्रश, बादल्या, मग व अन्य कडक प्लॅस्टिकचा वापर फुटपाथच्या स्टाईल्स बनवण्यासाठी केला.
https://twitter.com/Rajpachauri10/status/1162542600890376193
हैद्राबादमध्ये पहिले प्लॅस्टिक घर  –
लिंगमने हैद्राबादच्या उप्पलमध्ये 800 वर्ग फूटचे पहिले घर बनवले. हे घर बनवण्यासाठी 7 टन प्लॅस्टिकचा खर्च आला.


प्लॅस्टिकचे घर 30-40 वर्ष टिकणार –
याबाबतीत लोकांच्या मनात चिंता आहे, मात्र घाबरण्याचे कारण नाही. हे घर विट आणि मोर्टारच्या घरांसारखेच आहे. कंक्रीटचे घर बनवण्यासाठी 40 लाख रूपये खर्च येतो तर प्लॅस्टिकच्या घराला 700 रूपये प्रति वर्ग फूट खर्च येतो. तसेच प्लॅस्टिकचे घर हे आग, गर्मी आणि पाण्यापासून देखील सुरक्षित आहे. हे घर 40-50 वर्ष सहज टिकू शकते.

तेलंगणा सरकारकडून समर्थन –
लिंगम यांना तेलंगणा व ग्रेटर हैद्राबाद महापालिकेकडून देखील समर्थन मिळते आहे. काही शाळांकडून देखील बेंच बनवण्याची मागणी आली आहे. त्यांनी सांगितले की, स्वातंत्र्य दिनादिवशी देखील पंतप्रधान मोदींनी देशात प्लॅस्टिकवर बंदी घालणार असल्याचे सांगितले. आपल्याला प्लॅस्टिकचा विकल्प शोधायला हवा. ताग, बांबू आणि कॉटनमध्ये आपल्याला याचा पर्याय सापडेल.

Leave a Comment