अशा प्रकारे मिळवा आधारचा वापर झाल्याची माहिती


आधार कार्डाचे जेवढे फायदे आहेत तेवढेच त्याच्या सुरक्षिततेबद्दल देखील सतर्क राहणे गरजेचे आहे. सध्या आधार कार्डामध्ये फेरफार आणि फसवणुकीसारखे अनेक गोष्टी समोर येत आहेत. त्यामुळे तुमच्या आधार कार्डाचा उपयोग कोठे, कधी आणि कशासाठी झाला हे माहित असणे गरजेचे आहे. तुमच्या आधार कार्डचा वापर कोठे झाला आहे याबद्दल जाणून घेऊया.

सर्वात आधी uidai ची वेबसाईट https://uidai.gov.in/ वर जावे. येथे तुम्हाला ‘Aadhaar Authentication History’ असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही माय आधार सेक्शनवर जाल. त्याचबरोबर https://resident.uidai.gov.in/aadhaar-auth-history या लिंकवर देखील तुम्ही क्लिक करू शकता.

यानंतर तुमचा आधार नंबर विचारला जाईल. त्यानंतर 12 अंकाचा आधार नंबर टाकून सिक्युरिटी कँप्चा टाकत सेंड ओटीपीवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल.

ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला तुम्ही मागील सहा महिन्यात आधार कार्डचा वापर कोठे कोठे केला आहे, याबद्दल सर्व माहिती मिळेल.

Leave a Comment