तुमचे लव्ह लाइफ उद्धवस्त करु शकतात या चार गोष्टी !


प्रेम म्हणजे प्रेम असते आणि तुमचे आमचे ते सेम असते अशा आशयचे वाक्य आपल्याकडे प्रचलित आहे. पण प्रेम करुन ते निभावणे खूप जोखमीचे काम असते. प्रेमात एकमेकांवर विश्वास असणे फार आवश्यक असते. तुमचा जर एकमेकांवर विश्वासच नसेल तर समजून जा की तुमचे नाते फार तकलादू आहे आणि ते केव्हाही अंतिम घटिका घेऊ शकते. तुमचे नाते तुटण्यापासून जर तुम्हाला वाचवायचे आहे आणि उत्तरोत्तर प्रेम वाढवायचे आहे तर एकमेकांपासून काही गोष्टी कधीच लपवू नका.

आपण नात्यात जेव्हा खोटे बोलतो ते तेव्हा तुटण्याच्या वाटेवरच जाते असेच समजावे. कारण कोणतेही खोटे कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी ते कधी ना कधी समोर येते. तुमचे खोटे ज्या दिवशी पकडले जाईल त्याक्षणी तुमचे नाते संपुष्टात ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.

जेव्हा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असता एक्स- पार्टनरबद्दल तेव्हा कधीही खोटे बोलू नका. तुमचे एक खोटे चांगले नातेही संपवू शकते. तसंच तुमच्या एक्स- पार्टनरच्या टचमध्ये तुम्ही असाल तर ती गोष्टही लपवू नका.

आपल्या भावना रिलेशनशिप आणि प्रेमात कधीही लपवू नका. जे तुम्हाला वाटते ते मोकळेपणाने बोला. यामुळे तुमच्यातील बॉण्डिंग वाढेल.

तुम्ही जर ऑफिसमध्ये किंवा मित्र- मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये कोणाशी फ्लर्ट करत असाल तर त्या गोष्टी कधीही लपवू नका. मोकळेपणाने सांगा. आपल्या पगाराबद्दल रिलेशनशिप आणि प्रेमात कधीही खोटे सांगू नका. जेवढे निर्मळ तुम्ही नात्यात असाल तेवढे तुमचे नात दृढ होईल.

Leave a Comment