का पुसले जात नाही चंद्रावरील माणसांच्या पायांचे ठसे ?


चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारी व्यक्ती नील आर्मस्ट्राँग होती हे सर्वांनाच माहिती आहे. तर शेवटची व्यक्ती यूजीन सेरनन ही होती. त्यांनी 1972 मध्ये सर्वात शेवटी चंद्रावर आपल्या पायांचे ठसे सोडले होते. या गोष्टीला आता 46 वर्ष झाली आहेत. मात्र त्यांच्या पायाचे छापे आजही तसेच्या तसे आहेत. यामागे मोठे कारण आहे.

चंद्र पृथ्वीचा एकमात्र नैसर्गिक ग्रह आहे. याच्या निर्मिती मागे एक अनोखी कथा आहे. वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की,  आजपासून जवळपास 450 वर्षांपुर्वी एक उल्का पिंड पृथ्वीला धडकले, ज्यामुळे पृथ्वीचा एक भाग तुटून वेगळा झाला आणि तोच भाग नंतर चंद्र बनला.

वैज्ञानिकांनुसार, चंद्राचा केवळ 59 टक्के भागच पृथ्वीवरून दिसतो. तुम्हा आश्चर्य वाटेल की, जर चंद्र नाहीसा झाला तर पृथ्वीवरील दिवस हा केवळ 6 तासांचा असेल.

चंद्राच्या प्रकाशाच्या भागाचे तापमान 180 डिग्री सेल्सियपर्यंत पोहचते. तर अंधारातील भागाचे तापमान 153 डिग्री सेल्सियपर्यंत पोहचते.

अँरिझोना स्टेट युनिवर्सिटीचे प्रोफेसर मार्क रॉबिन्सन सांगतात की, चंद्र मातीच्या डोंगरांनी आणि धुळीने झाकलेला आहे. मातीचे कण देखील या थरात मिश्रीत होतात. यामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर पायच्या निशाण पुसले जात नाहीत.

मार्क रॉबिन्सन यांचे म्हणणे आहे की, चंद्रावरील अंतरिक्षांच्या पायांचे निशाण लाखो वर्ष तसेच राहतील. कारण चंद्रावर वायुमंडल नाही.

Leave a Comment