तुम्ही बनवू शकता का 27 सेकंदात पिझ्झा?


तुम्हाला भूक लागल्यावर पिझ्झा किती वेळात खाल नक्कीच काही मिनिटं तर लागतील. मात्र विचार करा पिझ्झा बनवण्यासाठी किती वेळ लागत असेल.

डॉमिनोजचा कर्मचारी झँग्रोस जेफला एक पिझ्झा बनवण्यासाठी केवळ 27 सेंकद लागतात. याचा अर्थ तासाला तब्बल 133 पिझ्झा तो बनवू शकतो. त्याच्या या टॅलेन्टमुळे मागील तीन वर्षांपासून त्याच्या नावावर डोमिनोज युरोपियन फास्टेस्ट पिझ्झा मेकरचा किताब आहे.


झँग्रोसने दरवर्षी होणाऱ्या डोमिनोज युरोपियन फास्टेस्ट पिझ्झा मेकर स्पर्धेत यंदाही विजय मिळवला. या स्पर्धेत अनेक पिझ्झा बनवणारे सहभागी होतात.

या स्पर्धेत प्रत्येक स्पर्धेकाला तीन 13 इंचाचे मोठे पिझ्झा बनवायचे होते. प्रत्येक पिझ्झाबरोबर पेपरोनीच्. 40 स्लाइस, 142 ग्राम मशरूम, 198 ग्राम चिझ आणि टॉमेटो पिझ्झा सॉस असणे गरजेचे होते.

परिक्षकांनी अगदी कठोर नियम वापरले. जर पेपरोनीच्या स्लाइस चुकीच्या आकाराच्या असतील अथवा दुसरी चूक असेल तर स्पर्धकाच्या वेळेच्या 15 सेंकद कमी केली जातात.

मात्र जेफने पुन्हा एकदा स्वतःला सिध्द करत हा किताब आपल्या नावावर केला. विजयानंतर जेफ म्हणाला की, मी मागिल 10 वर्षांपासून डोमिनोज पिझ्झा बनवत आहे. पुन्हा एकदा हा किताब जिकल्याने मला अभिमान वाटत आहे. ग्राहकांना बनवण्यासाठी लागणार मेहनत माहित नसते. मी जे करतो त्यामुळे माझे नाव होत आहे याचा आनंदच आहे, असे जेफ म्हणाला.

 

 

Leave a Comment