हा बेडूक स्वतः तयार करतो राहण्यासाठी तलाव


जगात बेडकांच्या अनेक जाती आहेत पण त्यातील सर्वात मोठ बेडूक आफ्रिकेत सापडतो. साडेतीन किलो वजनाचा हा बेडूक गोलियाथ या नावाने ओळखला जातो. या बेडकाची उंची ३४ सेंटीमीटर पर्यंत असते. या उंचीत पायाच्या लांबीची मोजदाद केली जात नाही. या बेडकासंदर्भात एक नवी माहिती नुकतीच समोर आली आहे. जर्नल ऑफ नॅचरल हिस्ट्रीमध्ये दिलेल्या या माहितीनुसार हा बेडूक राहण्यासाठी स्वतःच तलाव तयार करतो आणि वेळ पडली तर दोन- दोन किलो वजनाचे दगड हलवू शकतो.

बर्लिनचे संशोधक मर्विन शेफार यांनी या बेडकांची वर्तणूक न्याहाळण्यासाठी जंगलात कॅमेरे लावले होते. ज्या ठिकाणी बरीच माती आहे त्या ठिकाणी लावलेल्या कॅमेऱ्यात असे दिसले कि हे बेडूक अंडी घालताना माती दगड हटवून पाण्याची जागा म्हणजे छोटे तलाव तयार करतात आणि त्यात अंडी घालतात. हे बेडूक पिलांची काळजी चांगल्याप्रकारे घेतात. पिले पाण्यात वाढतात आणि अन्य प्राण्यांपासून संरक्षण व्हावे यासाठी पाण्यात चमक निर्माण करणारी द्रव्ये सोडतात. हे बेडूक पाउस, वेगाने वाहणारे नदी नाले येथे अधिक सापडतात. ते तोंडाने शिट्टी वाजवितात. द. आफ्रिकेतील इम्पुला नदीकाठी त्यांच्या २२ ब्रीडिंग साईट या संशोधकाने शोधल्या आहेत.

Leave a Comment