लेकुरवाळ्यांचे आयुष्य जास्त

अपत्यहीन दांम्पत्यांची संख्या समाजात वाढत चालली आहे. बदलते राहणीमान, बैठी जीवनशैली, व्यसने आणि सातत्याने येणारे तणाव यामुळे प्रजनन क्षमता घटत आहे. एका जागतिक पाहणीमध्ये पुरुषांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसून आले आहे. अर्थात हे प्रमाण जसे वाढत चालले आहे तसेच अपत्य संभवासाठी केले जाणारे प्रयोगही प्रगत अवस्थेला चालले आहेत. त्यामुळे कोणतेही दांम्पत्य अपत्याविना राहणार नाही अशी खात्री डॉक्टर मंडळी देत आहेत.

याउपरही काही लोकांना मुले होत नाहीत. या गोष्टीचा माणसाच्या आयुष्यावर काय परिणाम होतो यावर आता संशोधकांनी भर दिला आहे. त्यांना असे आढळले आहे की ज्यांना भरपूर मुले बाळे असतात त्यांना दीर्घायुष्य लाभते. म्हणजे मुले बाळे नसणार्‍या दांम्पत्यांचे आयुष्य लेकुरवाळ्या दांम्पत्यांपेक्षा कमी असते. डेन्मार्क मध्ये या संबंधात एक प्रयोग करण्यात आला आहे आणि या प्रयोगाचे निष्कर्ष जर्नल ऑङ्ग एपिडेमियालॉजी ऍन्ड कम्युनिटी हेल्थ या इंग्रजी मासिकात छापून आले आहेत.

या प्रयोगासाठी १९९४ ते २००५ या कालावधीत २१ हजार २७६ दांम्पत्यांची निरीक्षणे करण्यात आली. या दांम्पत्यांनी आपल्याला मूल व्हावे यासाठी इनर्व्हटो ङ्गर्टीलायझेशनचा उपचार मिळावा यासाठी प्रयत्न केले होते. म्हणजे ही दांम्पत्ये मुळात निसर्गत: आई-बाबा होण्यास अपात्र होती. अशा पती-पत्नींच्या आयुष्याची निसर्गत: माता-पिता झालेल्या जोडप्यांच्या आयुष्यांशी तुलना करण्यात आली. तेव्हा असे दिसून आले की ज्यांना मुले होत नाहीत त्यांचे आयुष्यमान मुले होणार्‍या दांम्पत्यांपेक्षा कमी असते. अशी जोडपी कर्करोगाने अधिक प्रमाणात मरण पावतात आणि लवकर मरतात असेही दिसून आले होते.

ज्या मातापित्यांनी स्वत:ला मूल होत नसल्यामुळे ते दत्तक घेतले होते त्यांच्या आयुष्यामानात थोडी भर पडली म्हणजे दत्तक न घेणार्‍या अपत्यहीन दांम्पत्यापेक्षा ही दत्तक घेणारी दांम्पत्ये थोडी जास्त जगली. स्वत:ला मूल होत नसली तरी ही जोडपी दत्तक मुलाच्या रुपात का होईना प्रेमाचा आविष्कार घडवितात आणि त्यातून त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण होऊन ते अधिक जगू शकतात. असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment