मूर्तींचे पाण्यातच का होते विसर्जन?

visar
देशात गेले दहा दिवस साजर्‍या झालेल्या गणेशोत्सवाची सांगता विसर्जन मिरवणुकीने होत आहे. गणेशोत्सव असो वा नवरात्री या निमित्ताने स्थापन केल्या गेलेल्या प्रतिमा पाण्यात विसर्जित केल्या जातात. यामागे कांही कारणे दिली जातात.

पुराणात या संदर्भात अनेक संदर्भ मिळतात. पाणी हे ब्रह्मस्वरूप मानले जाते व सृष्टीची सुरवात पाण्यातच झाली व तिचा अंतही महाप्रलयाने होणार अशी समजूत आहे. पाणी हे ज्ञानाचे व बुद्धीचे प्रतीक मानले जाते. श्रीहरी म्हणजेच विष्णूंचा निवास क्षीरसागरात असतो अशीही कल्पना आहे. यामुळेच जेव्हा पाण्यात प्रतिमा विसर्जित केली जाते, तेव्हा त्या मूर्तीतील देवअंश मूर्तीतून मुक्त होऊन परत देवलोकात जातो अशी समजूत आहे. म्हणजेच परब्रह्मात परमात्मा लीन होतो. अर्थात हे विसर्जन निर्मल जलात करावे असा संकेत आहे.

अन्य एका कथेनुसार महर्षी व्यासांनी गणेशाला महाभारताची कथा दहा दिवस ऐकविली. तो काळ गणेशचतुर्थी ते अनंत चतुर्दशी असा होता. या कथेचा प्रभाव इतका होता की दहा दिवस ती सतत ऐकल्याने गणेशाच्या अंगाचे तापमान वाढले व त्याला ज्वर आला. व्यासांनी त्वरीत त्याला जवळच्या कुंडात डुबकी मारायला लावली व त्यामुळे त्याचा ताप उतरला. विसर्जन हे तटस्थतेचा धडा शिकविते. म्हणजे जन्म मृत्यू होणारच त्यामुळे मोह मायेपासून दूर राहायला शिकले पाहिजे असे यातून प्रतीत केले जाते.

Leave a Comment