सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शिल्पाने दिला भविष्यात मोठा निर्णय घेण्याचा इशारा!


गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी चर्चेत आहे. पती राज कुंद्राच्या पॉर्न प्रकरणात अटक झाल्यानंतर शिल्पा बराच वेळ सोशल मीडियापासून लांब होती. त्यानंतर मध्येच ती काही पोस्ट करत सकारात्मक मेसेज चाहत्यांना द्यायची. शिल्पाने आता सोशल मीडियावर आणखी एक सकारात्मक पोस्ट शेअर केली आहे.

आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून शिल्पाने एक पोस्ट शेअर केली आहे. शिल्पाने अमेरिकन लेखक कार्ल बार्ड यांच्या पुस्तकाचे एक पान शेअर केले आहे. शिल्पाने यातुन तिच्या भविष्यातील नियोजनेबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कोणीही मागे जाऊ शकत नाही परंतु नवीन सुरुवात करु शकतो. जर आता पासून कोणी त्या गोष्टींकडे लक्ष दिले, तर शेवट वेगळा होऊ शकतो.

त्यात पुढे सांगण्यात आले आहे की आपला बराच वेळ आपल्या वाईट निर्णय आणि चुकांबद्दल विचार करण्यात प्रत्येक व्यक्ती घालवते. चुकीचा निर्णय आम्ही का घेतला याचे विश्लेषण करण्यात आपला बराच वेळ वाया जातो. माझी इच्छा आहे की आपण हुशार, किंवा खूप चांगले असायला पाहिजे होतो.

आपण कितीही विचार केला तरी आपण आपला भूतकाळ बदलू शकत नाही. पण योग्य निर्णय घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. पूर्वी केलेल्या चुका परत न करता आपल्या सभोवतालच्या लोकांशी चांगले रहा. आपल्याला स्वतःला बदलण्यासाठी किंवा नव्याने सुरुवात करण्यासाठी अनेक संधी मिळतील. जे मी पूर्वी केले, तशी मी आहे असे समजु नका. मला जे वाटेल ते मी करू शकते.