सुरेश रैना आणि डिव्हीलीअर्स आयपीएल १०० कोटी क्लबमध्ये सामील

करोना मुळे आयपीएल २०२१ सिझनमधले सामने ४ मे पासून बंद केले गेले आणि आता १९ सप्टेंबर पासून ते युएई मध्ये पुन्हा खेळविले जात आहेत. या सिझन मध्ये आणखी दोन बडे खेळाडू १०० कोटी क्लबचा हिस्सा बनले आहेत. सीएसकेचा सुरेश रैना आणि एबी डिव्हीलिअर ही ती नावे आहेत.

यापूर्वी आणखी कोणते खेळाडू या क्लबचा हिस्सा बनले आहेत आणि आयपीएल मधून त्यांनी किती कमाई केली याविषयीची माहिती अशी. या यादीत चेन्नई सुपर किंग्सचा कप्तान एमएस धोनी अग्रस्थानी आहे. गतवर्षी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून संन्यास घेतला आहे.चेन्नईला त्याने तीन वेळा विजेतेपद मिळवून दिले आहे. त्याचा पगार १५ कोटी असून त्याने आत्तापर्यंत आयपीएल मधून १३७ कोटींची कमाई केली आहे. इतकी रक्कम कमावणारा तो पहिला खेळाडू आहे.

मुंबई इंडियन्सचा रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. यशस्वी कप्तान अशी ओळख मिळविलेल्या रोहितने मुंबईला पाच वेळा विजेतेपद मिळवून दिले आहे. त्याने आयपीएल मधून आत्तापर्यंत १३१ कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. विराट कोहली रॉयल चॅलेंजरचा कप्तान असून त्याची आयपीएल कमाई या सिरीज नंतर १३० कोटींवर जाणार आहे. त्याचा पगार आहे १७ कोटी.

सुरेश रैना या यादीत चार नंबरवर असून सिझन २०२१ मध्ये तो १०० कोटी क्लब मध्ये आला आहे. आत्तापर्यत त्याची कमाई ९९.७ कोटी होती ती सिझन संपताना १०० कोटीच्या वर जाणार आहे. एबी डिव्हीलिअर्सची कमाई सिझन २०२१ मध्ये १०२. ५१ कोटींवर जात असून १०० कोटी क्लब मध्ये सामील होणारा तो पहिला परदेशी खेळाडू आहे.