नितीन गडकरीची युट्युब रॉयल्टीतून महिना ४ लाखची कमाई

केंद्रीय रस्ते बांधणी, राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधान मोदी वारंवार सांगत असलेल्या ‘संकटात संधी शोधा’ या सल्ल्याचा सर्वात योग्य वापर करून घेतला आहे. मोदींचा सल्ला आत्मसात करताना गडकरींनी युट्युबच्या माध्यमातून महिना चार लाख रुपये कमाई करण्याची किमया करून दाखविली आहे.

इंदोर येथे रोड प्रोजेक्टचे उद्घाटन आणि पायाभरणी कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी त्यांच्या भाषणात ही कथा सांगितली. ते म्हणाले करोना संकटाने मला दोन गोष्टी दिल्या. गम्मत म्हणून सुरु केलेल्या या कामातून आता मला चार लाख रुपये कमाई होते आहे. कशी ते मी तुमच्याशी शेअर करतो.

कोविड लॉकडाऊन काळात गडकरी यांना मुळातच खाण्याची आवड असल्याने त्यांनी युट्यूब वर अनेक पाककृती पाहून त्या आत्मसात केल्या. करून पहिल्या. आता ते अनेक पदार्थ बनवू शकतात. दुसरे म्हणजे व्हिडीओ कॉन्फरन्सिंग मध्ये बोलणे. या व्हीडीओना अमेरिका, न्युझीलंड, जर्मनी येथील विद्यापीठांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. गडकरी यांनी या काळात इतकी भाषणे केली की त्यांनी त्याची कधी कल्पना सुद्धा केली नव्हती. त्यामुळे या भाषणांची रॉयल्टी म्हणून युट्युब कडून त्यांना ४ लाख रुपये मिळत आहेत. त्यांच्या व्हीडीओंची व्ह्यूअरशिप करोना काळात प्रचंड वाढल्याचे त्यांनी सांगितले.