शिल्पा शेट्टीने घेतले वैष्णोदेवीचे दर्शन

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने बुधवारी १५ सप्टेंबरला जम्मू काश्मीर मधील माँ वैष्णोदेवीचे दर्शन केल्याचे फोटो सोशल मीडियावर झळकले आहेत. शिल्पा, कटरा मार्गाने घोड्यावरून वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेली तेव्हा शेजारी पोलीस दिसत होते. एएनआयच्या रिपोर्टनुसार शिल्पा बुधवारीच कटरा येथे पोहोचली आणि त्वरित घोड्यावरून माँ वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी रवाना झाली.

यावेळी शिल्पा ‘जय माता दी’ जप करत होती. वैष्णोदेवीच्या दर्शनानंतर तिने नगरोटा येथे कोल कंडोली मंदिरात पूजा केली. त्यावेळी फुले खरेदी करत असतानाचे तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर पत्रकारांची बोलताना तिने, ‘येथे येऊन शांत वाटते आहे’ असे सांगितले.

शिल्पाने गणेशचतुर्थी दिवशी घरात गणपती बसवून दीड दिवसाने विसर्जन केले होते. त्याचेही फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले होते. शिल्पाला या दोन्ही फोटोंवरून ट्रोल केले गेले आहे कारण तिचा पती राज कुंद्रा याच्याविरोधात पोर्न फिल्म प्रकरणात मुंबई पोलीसांनी आरोपपत्र दाखल केले आहे.