शाओमीचा नवा ११ लाईट एनई ५ जी फोन येतोय

शाओमी भारतातील ग्राहकांसाठी २९ सप्टेंबर रोजी नवा स्मार्टफोन सादर करत असल्याची घोषणा झाली आहे. हा नवा फोन २०२१ मध्ये सादर झालेल्या सर्व स्मार्टफोन मध्ये अतिशय सडपातळ आणि वजनाला हलका असेल असा दावा कंपनीने केला आहे. शाओमीने ‘मी’ ब्रांड बंद केला आहे. त्यामुळे नवा स्मार्टफ़ोन शाओमी ब्रांड खाली ११ लाईट एनई ५ जी नावानेच लाँच केला जाणार आहे. युरोप मध्ये हा फोन नुकताच लाँच केला गेला आहे. भारतात हेच व्हेरीयंट सादर केले जाईल असे सांगितले जात आहे.

या फोनसाठी ड्युअल नॅनो सिम, ६.५५ इंची फुल एचडी डिस्प्ले, ८ जीबी रॅम, २५६ जीबी इंटरनल स्टोरेज दिले गेले आहे. रिअरला ट्रिपल कॅमेरा सेट आहे. प्रायमरी कॅमेरा ६४ एमपी, ८ एमपीचा अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि ५ एमपीचे टेली मॅक्रो लेन्स असून सेल्फी साठी २० एमपीचा फ्रंट कॅमेरा आहे.

या फोनसाठी ४२५० एमएएचची, ३० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट बॅटरी दिली गेली असून फोनची किंमत साधारण ३० हजार रुपयांपर्यंत असेल असा अंदाज आहे. हा फोन युरोप मध्ये ३६९ युरो म्हणजे ३२ हजार रुपयांना उपलब्ध आहे.