न्यूझीलंड क्रिकेटची टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर होणाऱ्या भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याला स्थगिती


नवी दिल्ली – भारताचा टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर न्यूझीलंड दौरा होणार होता. भारतीय संघ या दौऱ्यात दोन कसोटी आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार होता. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा दोन्ही देशांमध्ये आयोजित केलेली दोन कसोटी सामन्यांची मालिका भाग आहे. पण हा दौरा न्यूझीलंड क्रिकेटने स्थगित केला आहे. Stuff.co.nz ने दिलेल्या वृत्तानुसार न्यूझीलंड क्रिकेटच्या प्रवक्त्याने दौरा रद्द केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिली आहे. पण अद्याप दौरा पुढे ढकलण्याबाबत बीसीसीआय आणि क्रिकेट न्यूझीलंडकडून कोणतेही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

२०२२ पर्यंत भारताचा न्यूझीलंड दौरा स्थगित करण्यात आला आहे. कोरोना प्रादुर्भावाबाबत न्यूझीलंडमध्ये क्वारंटाइनचे कडक नियम आहेत. ऑस्ट्रेलियात २०२२ मध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकानंतर हा दौरा निश्चित केला जाईल, असे सांगण्यात आले आहे. विश्वचषकानंतर कीवी क्रिकेटर डिसेंबरच्या सुरुवातीला मायदेशी परतणार नाही. मायदेशी परतल्यानंतर संघाला आयसोलेशन आणि क्वारंटाइनचा कालावधी १४ दिवसांचा आहे.

दुसरीकडे २८ डिसेंबर किंवा पुढे बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी ढकलली जाण्याची शक्यता आहे. बांगलादेश दोन कसोटी आणि ३ टी-२० मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे या मालिकेवरही कोरोनाचे सावट असणार आहे.

दरम्यान, या वर्षाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेचा दौरा भारतीय क्रिकेट संघ करणार आहे. भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा जाहीर झाला असून हा दौरा १७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ४१ दिवसांच्या दौऱ्यात टीम इंडिया कसोटी सामने, एकदिवसीय सामने आणि टी-२० सामने खेळणार आहे. भारताचा दौरा २६ जानेवारीला शेवटच्या टी-२० सामन्याने संपेल. भारत दौऱ्याची घोषणा क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने केली.

भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक

कसोटी मालिका

  • पहिली कसोटी – १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर, जोहान्सबर्ग
  • दुसरी कसोटी – २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर, सेंच्युरियन
  • तिसरी कसोटी – ३ जानेवारी ते ७ जानेवारी, जोहान्सबर्ग

एकदिवसीय मालिका

  • पहिला सामना – ११ जानेवारी, बोलंड पार्क, पार्ल सिटी
  • दुसरा सामना – १४ जानेवारी, न्यूलँड्स, केपटाऊन
  • तिसरा सामना – १६ जानेवारी, न्यूलँड्स, केपटाऊन

टी-२० मालिका

  • पहिला सामना – १९ जानेवारी, न्यूलँड्स, केपटाऊन
  • दुसरा सामना – २१ जानेवारी, न्यूलँड्स, केपटाऊन
  • तिसरा सामना – २३ जानेवारी, बोलंड पार्क, पार्ल सिटी
  • चौथा सामना – २६ जानेवारी, बोलंड पार्क, पार्ल सिटी