काल दिवसभरात 30,570 कोरोनाबाधितांची नोंद, तर 431 रुग्णांचा मृत्यू


नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येतील चढ-उतार कायम असून मागील चार दिवसांनी देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशी वाढ झाल्याचे दिसून आले. आरोग्य मंत्रालयाने आज जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 30,570 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 431 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 38,303 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.

महाराष्ट्रात काल दिवसभरात 3,783 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 364 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. आतापर्यंत राज्यात 63 लाख 17 हजार 070 बाधितांनी कोरोनावर मात केल्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97.07 टक्के आहे. तसेच राज्यात काल 56 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा डेथ रेट 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 49 हजार 034 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 13,258 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण 16 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.