पहिल्या खासगी अंतराळ सफरीचा रचला गेला इतिहास

एलन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीने अंतराळ क्षेत्रात बुधवारी रात्री नवा इतिहास रचला. इन्स्पिरेशन ४ मिशन, जगातील पहिल्या ऑल सिव्हिलियन क्रू सह लाँच केले गेले असून हे चार अंतराळ प्रवासी तीन दिवस पृथ्वीपासून ५७५ किमी वरच्या कक्षेत राहणार आहेत. ड्रॅगन कॅप्सूल मधून फाल्कन ९ रॉकेटच्या सहाय्याने अंतराळात झेपावलेल्या या मिशनच्या चालक दलात कुणीही व्यावसायिक अंतराळ प्रवासी नाही.

नासा प्रक्षेपण केंद्रातून हे रॉकेट लाँच केले गेले असले तरी ते पूर्णपणे स्पेस एक्स कंपनीचे खासगी मिशन आहे. कंपनीचे हे पहिले पूर्ण खासगी मानव अंतरीक्ष उड्डाण आहे. अब्जाधीश ग्राहक जेरेड इसाकॉमन रॉकेट कंपनीने क्रू ड्रॅगन कॅप्सूल भाडेतत्वावर घेतली आहे मात्र त्यासाठी किती पैसे मोजले हे उघड केलेले नाही. या मिशन साठी २०० दशलक्ष डॉलर्स मोजले गेले असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. फेब्रुवारी मध्येच या मिशनची घोषणा केली गेली होती.

हे प्रवासी आंतरराष्टीय अंतराळ स्थानकाच्या वरच्या कक्षेत राहणार असून काही शास्त्रीय प्रयोग करणार आहेत. या चार प्रवाशांमध्ये फिजिशियन हेली अर्सेना, एरोनॉटिक्स इंजिनिअर क्रिस सोम्बोस्की, सायंटीस्ट सायन प्रोक्टर यांचा समावेश आहे.