देशात काल दिवसभरात 27,176 कोरोनाबाधितांची नोंद; तर 284 रुग्णांचा मृत्यू


नवी दिल्ली – आज सकाळी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 27,176 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 284 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 38,012 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान मंगळवारी केरळात 15,876 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आल्यामुळे केरळमधील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 44,06,365 वर पोहोचली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात केरळमध्ये जवळपास 30 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात येत होती. पण, त्यानंतर कोरोनाच्या प्रादुर्भावात घट झाल्याचे पाहायला मिळाले. तर काल दिवसभरात 129 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

तर दूसरीकडे महाराष्ट्रात काल दिवसभरात 3,530 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 3 हजार 685 बाधित कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 12 हजार 706 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97. 06 टक्के झाला आहे. तर काल दिवसभरात 52 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे राज्याचा डेथ रेट 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 49 हजार 671 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 13, 101 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण 16 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.