मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जावेद अख्तर यांनी केले कौतुक


मुंबई – महाराष्ट्रातील उद्धव ठाकरेंची लोकप्रियता पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूतील स्टॅलिन यांच्या तोडीची आहे. त्यांच्यावर त्यांचे सर्वात कठोर टीकाकारही कोणत्याही भेदभाव किंवा अन्याय करत असल्याचा आरोप करु शकत नसल्याचे म्हणत प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले आहे. जावेद अख्तर यांनी आपल्या आरसएस आणि भाजपासंबंधी केलेल्या वक्तव्यामुळे झालेल्या गदारोळावर सामनात लेख लिहून मौन सोडले आहे. त्यांनी यावेळी कोणीही उद्धव ठाकरे यांच्या सरकारला तालिबाने कसे व का म्हणू शकले हे मला तरी उमगलेले नसल्याचे सांगत कौतुक केले आहे.

एकीकडे माझ्यावर हिंदू उजव्या विचारसरणीचे समर्थक चिडलेले असताना एका प्रमुख राजकीय नेत्याने आपल्या महाविकास आघाडी सरकारला तालिबाने म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत उत्कृष्ट नेतृत्वाखाली ज्या तीन पक्षांच्या आघाडीचे महाराष्ट्रात सध्या सरकार स्थापन आहे त्यांच्यापैकी कोणत्याही पक्षाचा मी सदस्य नाही. आज महाराष्ट्रातील त्यांची लोकप्रियता पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूतील स्टॅलिन यांच्या तोडीची आहे. त्यांचे सर्वात कठोर टीकाकारही त्यांच्यावर कोणताही भेदभाव किंवा अन्याय करत असल्याचा आरोप करु शकत नाहीत. असे असताना कोणीही उद्धव ठाकरे यांच्या सरकारला तालिबाने कसे व का म्हणू शकले हे मला तरी उमगलेले नाही, असे जावेद अख्तर म्हणाले आहेत.