आयफोन १३ सिरीज लाँच

अॅपलचा २०२१ सालातला सर्वात मोठा इव्हेंट पार पडला असून त्यात आयफोन १३ सिरीज सह अनेक नवी उत्पादने सादर करण्यात आली आहेत. बहुप्रतीक्षित आयफोन १३, मिनी, प्रो आणि प्रो मॅक्स सिरीज सादर केली गेली असून आयपॅड २०२१ या वर्षातले लाँच होणारे पहिले उत्पादन ठरले.

आयफोन १३ सिरीजच्या डिझाईन मध्ये बदल केलेला नाही. या फोन साठी अल्युमिनियम बॉडी आणि ओलेड डिस्प्ले, एआय ५ बायोनिक चिपसेट, १२ एमपी कॅमेरा आणि सिनेमॅटिक मोड दिला गेला आहे.शिवाय ऑटोफोकस चेंज, डॉल्बी व्हिजन सपोर्ट आहे. आयफोन १३ सिरीज ५ जीला सपोर्ट करतात. या फोन मध्ये सर्वाधिक स्पीड मिळेल असा दावा केला गेला आहे.

आयफोन १३ मिनी बेसिक किंमत ६९९ डॉलर्स, आयफोन १३ची बेसिक किंमत ७९९ डॉलर्स असून १२८, २५६, ५१२ स्टोरेजचे पर्याय दिले गेले आहेत. आयफोन प्रो आणि प्रो मॅक्ससाठी ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे आणि हे फोन चार कलर्स मध्ये उपलब्ध आहेत. प्रो साठी ६.१ तर प्रो मॅक्स साठी ६.७ इंची स्क्रीन असून थ्री एक्स ऑप्टिकल झूम, मॅक्रो मोड प्रथमच दिला गेला आहे. हा मोड नाईट मोड मध्येच काम करेल. यात टेलिफोटो लेन्स दिले गेले आहे. प्रोची किंमत ९९९ तर प्रो मॅक्सची किंमत १०९९ डॉलर्स आहे. हे सर्व फोन २४ सप्टेंबर पासून विक्री साठी उपलब्ध होत आहेत.