ग्रीन ऐवजी ब्लू जर्सीत मैदानात उतरणार कोहली आणि कंपनी

आयपीएल २०२१ च्या सेकंडहाफ मधील सामने युएई मध्ये १९ सप्टेंबर पासून सुरु होत आहेत. येथे २० सप्टेंबरला विराटची रॉयल चँलेंजर बंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स मध्ये होणाऱ्या सामन्यात विराट आणि कंपनी ग्रीन ऐवजी ब्लू जर्सीत मैदानात उतरणार आहे. यामागचे कारण म्हणजे करोना महामारी मध्ये फ्रंटलाईन वर्कर्सनी समाजासाठी जे निस्वार्थ योगदान दिले त्यांना मानवंदना देणे हे आहे.

ट्विटरवरच्या टीमच्या अधिकृत अकौंटवर या संदर्भात केलेल्या पोस्ट मध्ये,’ ब्लू जर्सी घालताना अभिमान आणि गौरव वाटतो कारण हा रंग करोना फ्रंटलाईन योद्ध्यांच्या पीपीई किटच्या रंगाशी मिळताजुळता आहे. कोविड विरुद्ध लढाईत त्यांनी अमुल्य सेवा दिली आहे त्यांना श्रद्धांजली देणे हाही उद्देश आहे आणि करोना लढाई अजून संपलेली नाही हे सांगण्यासाठी सुद्धा आहे. मास्क लावणे, लस घेणे, हात धुणे यासाठी प्रेरणा देण्याचाही प्रयत्न आहे’ असे म्हटले गेले आहे.

वास्तविक रॉयल चँलेंजर लाल जर्सी मध्ये खेळते. पण प्रत्येक वर्षीच्या सिझन मधला एक सामना ही टीम ग्रीन जर्सी मध्ये खेळते. पर्यावरण कार्यक्रमांना पाठींबा दर्शविणे हा त्याचा उद्देश असतो. या वर्षी मात्र ग्रीन ऐवजी ब्लू जर्सी मध्ये टीम हा एक सामना खेळणार आहे. आत्तापर्यत रॉयल चॅलेंजर्सची या सिझन मधली कामगिरी चांगली असून त्यांनी ७ पैकी पाच सामने जिंकले आहेत. पॉइंट टेबल मध्ये टीम तीन नंबर वर आहे.