अफगाणी महिलांचे तालिबान विरोधात फॅशन कँपेन

अफगाणिस्थान मध्ये सत्ता काबीज केल्यावर तालिबानने महिलांसाठी शरीया कानून लागू केला आहे. या कायद्यानुसार महिलांना बुरखा घालणे बंधनकारक आहेच पण कोणत्याही प्रकारची फॅशन करणे हे शिक्षेला आमंत्रण आहे. एकट्या महिला घरातून बाहेर पडू शकत नाहीत. तालिबानी सत्ता क्रूर आहेच पण त्याची तमा न बाळगता अफगाणी महिलांनी सोशल मिडीयाच्या सहाय्याने तालिबान विरोधात अनोखे अभियान सुरु केले असून त्याला जगभरातून प्रतिसाद मिळतो आहे.

ट्विटरवर अफगाणी महिला पारंपारिक पोशाखातील त्यांचे जुने फोटो शेअर करत आहेत. अश्या शेकडो महिलांनी ‘#DOnotTouchMyClothes, #AfghanistanCulture, # AfghanWomen अश्या नावाने हे फोटो शेअर केले आहेत. पाकिस्तानच्या पेशावर मधील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या  सिबाघात उल्लाह या विद्यार्थ्यांने ट्विटरवर ते शेअर केले आहेत. तालिबानच्या ड्रेस कोड विरोधातील अनोखे अभियान म्हणून याकडे पाहिले जात आहे.