प्रिन्सेस डायाना? नव्हे! ही तर टिकटॉक स्टार रोझ

ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स चार्ल्स यांची पत्नी आणि प्रिन्सेस ऑफ वेल्श डायाना जिवंत असती तर यंदाच्या वर्षी ६० वा वाढदिवस साजरा करती. पण सोशल मीडियावर डायानाचे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत. फोटो मधली तरुण डायाना कुणालाही भुरळ पडेल इतकी सुंदर दिसते आहे. पण जरा नीट पाहिले तर खरे काय ते समजू शकेल. हे फोटो हुबेहूब डायानाची कॉपी असलेल्या टिकटॉक स्टार रोझ व्हॅन रिन या महिलेचे आहेत.

जगात एकसारखी दिसणारी सात माणसे असतात असे म्हणतात. रोझ डायाना सारखी दिसते. तिच्यावर डायानाचा प्रभाव आहे. त्यामुळे तिने डायाना सारखी हेअरस्टाईल करून घेतली आहे. तिचे ९ लाख फॉलोअर्स आहेत शिवाय इन्स्टावर १ लाख फॉलोअर आहेत. अर्थात ती खुपच तरुण आहे त्यामुळे तिला डायानाचा अवतार मानले जाते.

डायानाच्या ६० व्या जन्मदिवसाची संधी साधून रोझने डायानाच्या पाच ड्रेसची कॉपी करून खास फोटो शूट करून घेतले आहे आणि त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. प्रिन्सेस डायानाचा जन्म १ जुलै १९६१ ला झाला होता आणि ३१ ऑगस्ट १९९७ मध्ये कार अपघातात तिचा मृत्यू ओढवला होता. जगातील सुंदर महिलांमध्ये डायानाची गणना केली जात असे. आजही डायाना अनेकांची रोल मॉडेल आहे.