चित्रपट पहा आणि ९५ हजार रुपये मिळवा
चित्रपट पाहायला आवडते असे कोट्यवधी रसिक प्रेक्षक असतील. अर्थात प्रत्येकाची आवड वेगळी असू शकते. कुणाला मनोरंजक, कुणाला कॉमेडी, कुणाला रहस्यपट,कुणाला कौटुंबिक, कुणाला युद्धपट तर कुणाला हॉरर चित्रपट आवडतील. हॉरर चित्रपट चाहते सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत. त्याच्यासाठी एक खास संधी एका कंपनीने दिली आहे. बज नावा नावाची ही कंपनी १३ हॉरर चित्रपट पाहणाऱ्याला ९५ हजार रुपये देणार आहे. अर्थात त्यासाठी काही अटी आहेत.
कंपनीला असा प्रेक्षक हवा आहे जो हे १३ चित्रपट पाहील. त्यावेळी त्याला हातात फिट बँड घालावा लागणार आहे. चित्रपट पहात असताना हा बँड प्रेक्षकाच्या हृदयाचे ठोके मोजणार आहे.या चित्रपटात लो बजेट चित्रपट आहेत आणि बिग बजेटही आहेत. दोन्ही प्रकारचे चित्रपट प्रेक्षकाला तितकेच घाबरवू शकतात का याचे निरीक्षण केले जाणार आहे. प्रेक्षकाने सुद्धा त्याला कुठला चित्रपट पाहताना किती भीती वाटली ते सांगायचे आहे आणि चित्रपटाला रेटिंग द्यायचे आहे.
यावरून कंपनी हॉरर चित्रपट बनविण्यासाठी प्रत्यक्षात जितका खर्च केला जातो तेवढा आवश्यक आहे का याचा तपास करणार आहे. कोणते चित्रपट पहावे लागतील याची यादी कंपनीने दिली आहे. त्यात सॉ, एमिटीव्हिले हॉरर, अक्वा हाट प्लेस चे दोन्ही भाग, कॅन्डीमन, इंसायटीस, द ब्लेअर विच, प्रोजेक्ट, सिनिस्टर, गेट आउट, द पर्ज, हॅलोवन, पॅरानॉर्मल अॅक्टीव्हीटी, अॅनाबेल यांचा समावेश आहे.