रेल्वे स्टेशनच्या का लिहिली जाते बोर्डावर ‘समुद्र सपाटीपासूनची उंची’ ?


भारतीय रेल्वे आशियामधील दुसरे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आणि सरकारी मालकी असलेले जगातील सर्वात मोठे चौथे रेल्वे नेटवर्क आहे. भारतात रेल्वे स्टेशनची संख्या जवळपास 8000 आहे. या सर्व गोष्टी तर तुम्हाला माहित असतीलच.मात्र तुम्हाला माहित आहे का रेल्वे स्टेशनवरील बोर्डवर समुद्र सपाटीपासूनची उंची का लिहिली जाते ?

रेल्वे स्टेशन छोटे असो अथवा मोठे, प्रत्येक ठिकाणी एक पिवळ्या रंगाचा बोर्ड लावलेला असतो. या बोर्डवर शहराचे नाव हिंदी, इंग्रजी आणि उर्दुमध्ये लिहिलेले असते आणि त्याचाच खाली आणखी एक गोष्ट लिहिलेली असते. जर तुम्ही लक्ष दिले असेल तर पाहिले असेल की, बोर्डवर स्टेशनची समुद्र सपाटीपासूनची उंचीचा उल्लेख करण्यात आलेला असतो.

हे जग गोल आहे. आणि एकसमान उंची मोजण्यासाठी वैज्ञानिकांना एका अशा प्रकारच्या बिंदूची गरज होती जे एकसमान दिसेल. यासाठी समुद्र हा उत्तम पर्याय होता. कारण समुद्राचे पाणी एकसमान असते. त्यामुळे समुद्र सपाटीपासूनची उंची लिहिली जाते. आता तुम्ही विचार करत असाल की, रेल्वे स्टेशनवर हे लिहून काय फायदा होणार ?

तर रेल्वे स्टेशनवर समुद्र सपाटीपासूनची उंची लिहिल्याने प्रवाश्यांना फायदा होत नाही तर याचा फायदा रेल्वेच्या ड्रायव्हरला होता.

समजा, एखादी रेल्वे 100 मीटर समुद्र सपाटीच्या उंचीवरून 200 मीटर समुद्र सपाटीच्या उंची पर्यंत जात असेल तर ड्रायव्हरला निर्णय घेण्यास सोपे जाते. तो निर्णय घेऊ शकतो की, 100 मीटर अधिक चढासाठी त्याला इंजिनला किती पावर द्यावी लागेल.

जर रेल्वे खालच्या दिशेने येत असेल तर ड्रायव्हरला किती ब्रेक लावावा लागेल आणि किती वेग ठेवावा लागेल या सर्व गोष्टींसाठी रेल्वे स्टेशनवर समुद्र सपाटीपासूनची उंची लिहिली जाते.

याशिवाय समुद्र सपाटीपासूनच्या उंचीच्या मदतीने रेल्वेच्या वरती लागलेल्या विजच्या तारांना एकसमान उंची देण्यास मदत होते. जेणेकरून, विजेच्या तारा ट्रेनशी प्रत्येक वेळेस जोडलेल्या असतील.

Leave a Comment