लाखो रुपये खर्च करुनही या गावातील घरांना करत नाहीत रंगरंगोटी


नागदा (मध्यप्रदेश) – रंग ही अशी वस्तू जी प्रत्येकालाच आकर्षित करत असते. पण घर बांधण्यासाठी लाखो रूपये उज्जैनच्या आलोट तालुक्यातील कछालिया गावातील ग्रामस्थ खर्च करतात, पण ते या घरांची रंगरंगोटी करत नाहीत. रंगरंगोटी या गावातील फक्त सरकारी कार्यालये आणि मंदिरांवर केलेली असते. त्याच बरोबर या गावात लग्नकार्य किंवा इतर कार्यक्रमांमध्ये डेकोरेशनही करत नाहीत.

ही परंपरा कछालिया गावात अनेक पिढ्यांपासून सुरू आहे. या परंपरेचे गावातील वृद्धांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वजण पालन करतात. 1400 या गावाची लोकसंख्या असून 200 घरे येथे आहेत. पण यातील एकाही घरावर रंगकाम केलेले नाही. काळ्या रंगाच्या वापरावर गावात पूर्णतः बंदी आहे. काळ्या रंगाचे कपडे आणि बुट येथील ग्रामस्थ परिधान करत नाहीत. अगदी पायमोजे सु्द्धा वापरत नाहीत. रंगाचा उपयोग लग्न कार्यात माता पूजनावेळी सुद्धा करत नाहीत. फक्त देवी-देवतांच्या कलाकृतीवर रंग लावून पूजन करण्यात येते. अशाप्रकारे दिवाळीला पशुंच्या शिंग रंगवण्यासाठी तपकिरी रंग लावण्यात येतो.

याबाबत माहिती देताना 75 वर्षीय मंदिराचे पुजारी रतनपुरी गोस्वामी सांगतात की, कालेश्वर भगवानचे मंदिर गावात आहे. ग्रामस्थांची भगवान कालेश्वरावर आस्था असल्यामुळे आपल्या घरावर मंदिराशिवाय कोणाही रंगरंगोटी करत नाही. अनेक पिढ्यांपासून ही परंपरा सुरू आहे. पण यामागचे अख्यायिका काय आहे याबाबत कोणालाही काहीच माहिती नाही. या परंपरांना दोन-तीन वेळेस तोडण्यात आले असता दुर्घटना घडल्या. कोणीही कालेश्वर भगवानच्या मंदिरसमोरून घोडीवर बसून जात नाही. मंदिराच्या मागील बाजुने निघु जातात.

Leave a Comment