मुकेश अंबानी यांच्यापेक्षा जास्त त्यांच्या नातेवाईकांची छपाई


रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्यापेक्षा त्यांच्या नातेवाईकांचा पगार अधिक आहे. अंबानी यांनी 11 वर्षांपासून आपला पगार वाढवलेला नाही. मात्र त्यांच्या नातेवाईकांच्या पगारामध्ये दरवर्षी वाढ होत आहे. तर नीता अंबानी यांना मिळणाऱ्या फीमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे.

कंपनीने शुक्रवारी त्यांचे वित्तीय परिणाम जाहीर केले. त्यानुसार कंपनीला सात टक्के अधिक नफा झाला होता. तसेच जिओच्या उत्पन्नामध्ये देखील 44 टक्के वाढ झालेली आहे.

2008-09 पासून नाही वाढला पगार –
मुकेश अंबानी यांनी 2008-09 पासून स्वतःच्या पगारामध्ये कोणत्याच प्रकारची वाढ केलेली नाही. कंपनीद्वारे जाहीर करण्यात आलेल्या रिपार्टनुसार, त्यांचा वार्षिक पगार 15 करोड रुपये आहे. यामध्ये कमिशन, अलाउंस, अन्य लाभ यांचा समावेश आहे. मुकेश अंबानी यांना 2018-19 मध्ये 4.45 कोटी रुपये पगार आणि अलाउंस म्हणून कमीशन 9.53 करोड रुपये, अन्य लाभ 31 लाख रुपये आणि आणि रिटायरमेंट लाभ म्हणून म्हणून 71 लाख मिळाले होते.

नातेवाईकांना जास्त पगार –
मुकेश अंबानी यांचे नातेवाईक देखील कंपनीच्या बोर्डामध्ये पुर्णकाळ सदस्य आहेत. निखिल मेसवानी आणि हितल मेसवानी यांचा वार्षिक पगार 20.57 करोड रूपये आहे. 2017-18 मध्ये दोन्ही भावांना 19.99 करोड रूपये, 2016-17 मध्ये 16.58 करोड रुपये, 2014-15 मध्ये 12.03 करोड रुपये आणि 2015 मध्ये निखिलला 14.42 करोड तर हितलला 14.41 करोड रुपये पगार मिळाला होता.

अन्य लोकांच्या पगारात देखील वाढ –
कंपनीते एग्जिक्यूटिव डायरेक्टर पी एमएस प्रसाद आणि रिफायनरीचे मुख्य अधिकारी पवन कुमार कपिल यांच्या पगारात देखील दरवर्षी वाढ होत आहे. या दोन्ही व्यक्तींचा पगार क्रमशः 10.01 करोड आणि 4.17 करोड रुपये आहे.

नीता अंबानी यांच्या कमीशन फीमध्ये वाढ –
कंपनीच्या गैर-कार्यकारी संचालक नीता अंबानी आणि एसबीआयचे माजी चेअरपर्सन अरूंधति भट्टाचार्य यांच्या कमिशनमध्ये देखील वाढ करण्यात आली. नीता अंबानीला कमिशनच्या रुपात 1.65 करोड रूपये आणि सात लाख सिटिंग फीच्या रुपात मिळाले. तर भट्टाचार्य यांना 75 लाख रूपये कमिशन आणि सात लाख रूपये बोर्डाच्या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी मिळतात.

कंपनीच्या अन्य गैर-पुर्णवेळ संचालकांमध्ये मानसिंह एल भक्ता, योगेंद्र पी त्रिवेदी, दिपक सी जैन, रघुनाथ माशेलकर, अदिल जैनुलभाई, रमिंदर सिंह गुजराल आणि शुमित बँनर्जी यांचा समावेश आहे.

Leave a Comment