बिहारमधील गोपालगंज येथील मुख्य जिल्हा कार्यालयाजवळ 150 वर्ष जुने वटवृक्ष आहे. या झाडाच्या जवळपास 200 फांद्या सर्वत्र पसरलेल्या आहेत. हे झाड गोपालगंज जिल्हा कार्यालयापासून 52 किलोमीटर दुर असलेल्या बैंकुठपूर येथील सोनासती देवी मंदिराजवळ आहे.
या ठिकाणी आहे 150 वर्ष जुना वटवृक्ष
या झाडाची ब्रिटिश काळजी घेत असतं. ब्रिटिश या ठिकाणी निळीची शेती करत असे. या झाडाचे वैशिष्ट म्हणजे त्याच्या खाली तापमान हे 5 ते 6 डिग्री कमी असते. गरम हवा देखील या झाडाच्या सावलीत येऊन थंड होते. याच्या फांद्यांनी एकमेकांमध्ये अडकून जमीनीखाली खोल मुळे तयार झाली आहेत.
50 किलोग्राम कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात या फांद्या –
पर्यावरणवादी गौतम त्रिवेदी याला अक्षयवट असे म्हणतात. याचे बॉटेनिकल नाव फिक्स रीलिजोसा आहे. याच्या फांद्या ते 60 किलो कार्बन डायऑक्सोईड शोषून घेतात. अधिक प्रमाणात काब्रन डायऑक्साईडचे शोषन केल्याने मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती करतात. हेच कारण आहे की, तापमान 40 ते 42 डिग्री असताना देखील झाडाखालील तापमान 35 ते 36 डिग्री असते.
या झाडासमोर ब्रिटिशांच्या हवेलीचे अवशेष आहेत. ब्रिटिश असताना या ठिकाणी निळीची शेती होत असे. या हवेलीमध्ये ब्रिटिश अधिकारी नील हे व त्यांची पत्नी हेलन राहत असे. आजूबाजूच्या महिला या ठिकाणी सोनासती देवीची पुजा करण्यासाठी येतात. हेलनने येथे पुजा करण्यासाठी, कामगारांना सावली मिळावी यासाठी हे झाडाची काळजी घेतली होती.
हमीदपूरमध्ये राहणारे 70 वर्षीय गुलाब सिंह सांगतात की, 1960 मध्ये आम्ही लहान असल्यापासून हे झाड पाहत आहोत. आमच्या लहानपणापासून आजपर्यत हे झाड याच अवस्थेत आम्ही पाहायले आहे.