स्लॅप थेरपी, तजेलदार चेहऱ्यासाठी थोबाडीत मारून घ्या


आपला चेहरा चमकदार, तजेलदार असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. मग तो पुरुष असो वा स्त्री. चेहरा छान दिसण्यासाठी अनेक उपाय केले जातात, महागडी सौंदर्य प्रसाधने वापरली जातात आणि अनेक प्रकारच्या ट्रीटमेंट, फेशियल पॅक्स वापरले जातात. यात आता आणखी एक नवा ट्रेंड लोकप्रिय झाला आहे आणि तो आहे स्लॅप थेरपी. शुध्द मराठीत त्याचा अर्थ आहे थोबाडीत मारून घेणे. विशेष म्हणजे थायलंड मध्ये या थेरपीचा उगम झाला आणि आता ती कोरिया, अमेरीकेसह अनेक देशात लोकप्रिय बनली आहे.


या मागचे लॉजिक असे सांगितले जाते जेव्हा चेहऱ्यावर थपडा मारल्या जातात, तेव्हा चेहऱ्याचा रक्तप्रवाह सुधारतो. त्यामुळे त्वचेला उर्जा मिळते. चेहऱ्याला लावल्या जाणाऱ्या क्रीम, मॉईश्चरायझर मधून हाच परिणाम साधला जात असतो पण अनेकदा अशी क्रीम एखाद्याला अॅलर्जी आणू शकतात तो धोका स्लॅप थेरपी मध्ये टाळता येतो. ही थेरपी त्वचेतील कोलेजन वर प्रभावी ठरते. अर्थात थपडा मारून घेणे म्हणजे स्वतःला दुखापत करून घेणे नाही तर हलक्या हाताने चापट्या मारून घेणे आहे. त्वचेवर थोडे प्रेशर पडेल इतका जोर त्यासाठी द्यायचा आहे. यामुळे त्वचा ताजीतवानी होते आणि तजेलदार दिसते.

या थेरपीनंतर क्रीम किंवा तेल लावले गेले तर ते त्वचेत अधिक प्रमाणात शोषले जाते. त्यामुळे त्वचा नरम आणि मऊ होते. त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. स्लॅप थेरपीचे थायलंड मधून प्रशिक्षण घेतलेली पहिली प्रशिक्षित महिला असल्याचा दावा करणारी पश्चिम गोलार्धातील ताता सम्बंथन ही महिला सॅन फ्रान्सिस्को मध्ये तिचे ब्युटी पार्लर चालविते आहे. ही सांगते ही थेरपी खूपच लोकप्रिय झाली असून १५ मिनिटांसाठी ताता ३५० डॉलर्स चार्ज करते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment