या बुटांसाठी मोजले गेलेत लाखो कोटी रुपये


पादत्राणे पायांना आराम मिळावा आणि पायांना इजा होऊ नये यासाठी वापरली जातात. पादत्राणे जेवढी आरामदायी तेवढी त्यांची किंमत जास्त हे ओघाने आलेच. आजकाल पादत्राणे हाही फॅशनचा हिस्सा बनल्याने त्यांचे विविध ब्रांड उदयाला आले आहेत आणि त्यानुसार कमी अधिक किंमत त्यासाठी मोजली जात आहे. काही पादत्राणे मात्र केवळ ब्रांड किंवा आराम यासाठी खरेदी केली जात नाहीत तर त्यामागे काही इमोशन असतात. परिणामी ती लाखो कोटी रुपयात खरेदी केली जातात. त्यांचीच ही माहिती.

अमेरिकेचा बास्केटबॉलपटू जॉर्डन याने १९९७ मध्ये नाईकेचे जोडे सामना खेळताना घातले होते. या सामन्यात तो आजारी होता तरी त्याने सामन्यात ३८ पॉइंट मिळविले. त्यावेळी त्याने घातलेले ब्लॅक व रेड शूज २०१३ मध्ये चक्क ७१,६१,००० किमतीला विकले गेले तसेच जॉर्डनने १९८४ ऑलिम्पिक बास्केटबॉल अंतिम सामन्यात घातलेले शूज १ कोटी ३० लाख ७२ हजार रुपयांना विकले गेले होते. या सामन्यात अमेरिकेने स्पेनला हरविले होते. या बुटांचा लिलाव २०१७ साली केला गेला.


दुसरी कथाही बास्केटबॉल संदर्भातच आहे. प्रसिद्ध रॅपर डेक याने २०१४ मध्ये बास्केटबॉलचा सामना पाहायला आला असताना जे शूज घातले होते ते त्याने त्याच्या एका फॅनला भेट म्हणून दिले. या फॅनने ते शूज लिलावात विकले तेव्हा त्याला ६८ लाख ८८ हजार रुपये किंमत मिळाली होती. ब्लॅक क्रोमचे हे शूज खास रॅपर फॅमिली आणि त्यांचे निकटवर्ती यांच्यासाठीच बनविले गेले होते.


१९८९च्या हॉलीवूडपट बॅक टू फ्युचर या लोकप्रिय चित्रपटात जे बूट लोकप्रिय बनले होते त्याची कॉपी बनविली गेली आणि हे बूटही खूपच लोकप्रिय ठरले होते. २०१६ एडिशनचे हे बूट स्टॉकएक्स वेबसाईटवर ६,८८००० किमतीला विकले गेले. स्नीकर डिझायनर मध्ये नावाजलेला डोमिनिक चेब्रोन याने ब्रांड अँबेसीडर लेब्रोन जेम्ससाठी डिझाईन केलेले मगरीच्या कातडीचे बूट ६८ लाख ८७ हजार रुपयात विकले गेले. या बुटात २४ कॅरेट सोने आणि हिरे वापरले गेले होते.

Leave a Comment