भेगाळलेल्या टाचांवर घरगुती उपाय


हिवाळा अथवा काही जणांना उन्हाळ्यात पायाच्या टाचाना भेगा पडण्याचा त्रास होतो. विशेषतः तरुण मुली मुले यांना अश्या भेगा पडलेल्या टाचा अडचणीच्या होतात कारण त्यामुळे स्टायलिश चपला वापरता येत नाहीत शिवाय इन्फेक्शनची भीती असते. काही साध्या घरगुती उपायानी हा त्रास खूप कमी करता येतो. ज्यांच्या टाचाना भेगा पडतात ते कुणीही हे उपाय सहज करून पाहू शकतात आणि टाचा कोमल राखू शकतात.

एका टब मध्ये कोमट पाणी घेऊन त्यात एक चमचा मीठ, थोडा लिंबू रस आणि दोन चमचे ग्लिसरीन घालून त्यात पाय १० ते १५ मिनिटे बुडवून ठेवावेत व नंतर हळुवारपणे घासावेत. याने भेगा कमी होतात. आठवड्यातून दोन वेळा हा उपचार केल्यास टाचा गुळगुळीत होतात.


बदाम, खोबरेल तेल रात्री टाचांना चोळावे आणि सॉक्स घालावेत. यामुळे टाचा भेगा कमी होतातच पण हेच तेल त्वचा कोरडी असेल तर अंगाला लावावे त्याने त्वचा नरम होते. पाय स्वच्छ धुवून व्हॅसलीनचे मालिश करून सॉक्स घातल्याने सुद्धा टाचेच्या भेगा कमी होतात.

घरात बहुदा केळे असते ते कुस्करून भेगाळलेल्या टाचेवर घासून लावावे. त्यापूर्वी टाचा गरम पाण्याने धुवाव्यात. १० -२० मिनिटांनी धुवून टाकावे. २ -३ दिवसात टाचेच्या भेगा भरून येतात. मध साधारण गरम पाण्यात टाकून १० ते २० मिनिटे पाय बुडवून ठेवावे आणि प्युमिक स्टोनने टाचा हळुवार घासून स्वच्छ कराव्यात. हा उपाय आठवड्यांतून तीन वेळा करावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment