शिल्पा शेट्टी गणेशोत्सव साजरा करतानाचे फोटो शेअर केल्यामुळे झाली ट्रोल


लाडक्या गणपती बाप्पाचे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरीदेखील आगमन झाले आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीकडे दरवर्षी प्रमाणे यंदा देखील गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. लालबागच्या राजाची प्रतिकृती दरवर्षी शिल्पा स्थापन करते. तिने ही परंपरा यंदा देखील कायम ठेवली. शिल्पाने नुकतेच मुलगा वियान आणि मुलगी समिषासोबत गणेशोत्सव साजरा करतानाचे काही फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. शिल्पा यात तिच्या मुलांसोबत आनंद साजरा करताना दिसत आहे.

आपल्या इन्स्टाग्रामवर शिल्पा शेट्टीने गणेश पुजनाचा व्हिडीओ देखील शेअर केला होता. पण अनेक नेटकऱ्यांनी या फोटो आणि व्हिडीओवर कमेंट करत शिल्पाला ट्रोल केले आहे. मुंबई पोलिसांनी शिल्पाचा पती राज कुंद्राला १९ जुलैला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक केली आहे. राज कुंद्रा विरोधात अनेक पुरावे हाती लागल्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. अद्याप राज कुंद्रा अटकेतच आहे. अशातही शिल्पा गणेशोत्सव साजरा करत असताना आनंदात दिसत असल्यामुळे अनेकांनी तिला ट्रोल केले आहे.


एक युजर शिल्पा शेट्टीच्या या फोटोंवर कमेंट करत म्हणाला, गणपती बाप्पा कुंद्राजींना देखील सद्बुद्धी द्या. तर दुसरा युजर म्हणाला, कुठे फिल्म बनवायला गेला राज कुंद्रा, आणखी एक युजर म्हणाला, शिल्पा काकू मुलाचे बाबा दिसत नाहीत. अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत शिल्पाला राज कुंद्रा कुठे आहे विचारत निशाणा साधला आहे.