आता मॅकडोनाल्ड्समध्ये मिळणार कडक मसाला चहा आणि हळदीचे दूध


मुंबई – आता रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यावर मॅकडोनाल्ड्स इंडिया भर देत असून त्यांनी त्यांच्या मॅकॅफे मेनूमध्ये हळदीचे दूध आणि मसाला कडक चाय अशी दोन उत्पादने जोडली आहेत. ही दोन्ही उत्पादने मॅकेफे आउटलेटमध्ये यापुढे उपलब्ध असतील, अशी माहिती मॅकॅफे आउटलेटला चालवणारी मॅकडोनाल्ड्सची वेस्ट अँड साउथ फ्रेंचायजी हर्डकास्ले रेस्टॉरेंटने दिली आहे.

ही फ्रँचायजी देशातील 42 शहरांमध्ये 305 मॅकडोनाल्ड्स रेस्टॉरंट चालवते. त्यांनी म्हटले आहे की हळदीचे दूध हे एक प्रोडक्ट असेल. हे एक अद्वितीय ट्विस्ट असलेले प्रोडक्ट आहे. यामध्ये आयुर्वेदिक औषधांचा वापर करण्यात आला आहे. हे उत्पादन कफ, खोकला, सर्दी सारख्या सर्व रोगांसाठी फायदेशीर ठरेल. तसेच प्रतिकारशक्ती वाढवण्यात हळदीची मोठी भूमिका असते, असे कंपनीने म्हटले आहे. यासह, वेलची आणि केशरसारखी पोषक तत्त्वे देखील या उत्पादनात असतील. शरीराला हर्बल आणि मसाल्याच्या वापरामुळे झटपट ऊर्जा मिळते. मसाला कडक चाय ही भारतीय ग्राहकांचे प्रेम आणि भावनांच्या दृष्टीकोनातून सादर करण्यात आली आहे.

मसाला कडक चायच्या एका कपची किंमत 99 रुपये असेल. हळदीच्या दुधाच्या एका पॅकची किंमत 140 रुपये असेल. मॅकडोनाल्ड्स इंडियाचे पश्चिमी आणि दक्षिणी भारताचे डायरेक्टर अरविंद आर पी म्हणाले की, आमच्या मेन्यूमध्ये नेहमीच इनोवेशन होत राहिले आहे. आम्ही या नवीन उत्पादनाबद्दल उत्साहित आहोत. बऱ्याच संशोधनात असे सांगितले गेले आहे की ग्राहक आता अधिक प्रतिकारशक्ती असलेल्या रेसिपी आणि उत्पादनांवर लक्ष केंद्रित करत आहेत.