दहावी पास उमेदवारांसाठी आसाम राइफल्समध्ये नोकरीची सुवर्णसंधी


नवी दिल्ली -कोरोना संकटामुळे आपल्यापैकी अनेकजणांनी आपला रोजगार गमावलेला असल्यामुळे अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. पण यासाठी कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीअभावी ही संधी हुकते. त्यामुळेच कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न माझा पेपरने सुरु केला आहे. जेणेकरुन ज्यांना रोजगाराची गरज आहे, ते उमेदवार त्याठिकाणी अर्ज करु शकतील.

दरम्यान नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी आता आणखीन एक नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. आसाम राइफल्समध्ये दहावी पास उमेदवारांसाठी मोठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली आहे. ही भरती ग्रुप B आणि C च्या तब्बल 1230 जागांसाठी असणार आहे. यापैकी महाराष्ट्रासाठी 61 जागा राखून ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

 • Safai Masalchi (Male)
 • Cook (Male)
 • Barber (Male)
 • Safai Pharmacist (Male/Female)
 • Veterinary Field Assistant (Male)
 • X-Ray Assistant (Male)
 • Surveyor (Male)
 • Plumber (Male)
 • Electrician (Male)
 • Upholster (Male)
 • Vehicle Mechanic (Male)
 • Instrument Repair/ Mechanic (Male)
 • Electrician Mechanic Vehicle (Male)
 • Engineering Equipment Mechanic (Male)
 • Linemen Field (Male)
 • Electrical Fitter Signal (Male)
 • Personal Assistant (Male & Female)
 • Clerk (Male & Female)
 • Bridge & Road (Male & Female)

पात्रता आणि अनुभव – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ITI किंवा दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 सप्टेंबर 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.