काल दिवसभरात देशात ३३ हजार ३७६ कोरोनाबाधितांची नोंद, ३०८ रुग्णांचा मृत्यू


नवी दिल्ली – देशात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव काहीसा ओसरताना दिसत आहे. दरम्यान समोर येणारी दैंनदिन आकडेवारी तर असेच संकेत देत आहे. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोनाबाधितांच्या आणि मृतांच्या संख्येतही गेल्या काही दिवसांपासून चढउतार दिसून येत आहे.

काल दिवसभरात देशात ३३ हजार ३७६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या तीन लाख ९१ हजार ५१६ झाली आहे. तर काल दिवसभरात ३२ हजार १९८ रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता तीन कोटी २३ लाख ७४ हजार ४९७ वर पोहोचली आहे.

देशातील रुग्ण बरे होण्याचा दर आता ९७.४९ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर गेल्या ७८ दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचा साप्ताहिक दर सातत्याने तीन टक्क्यांच्या खालीच आहे. तर देशात काल दिवसभरात ३०८ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे कोरोनामुळे मृत पावलेल्यांची एकूण संख्या आता चार लाख ४२ हजार ३१७ वर पोहोचली आहे. देशात कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या एकूण नागरिकांची संख्या आता ७३ कोटी ५ लाख ८९ हजार ६८८ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात ६५ लाख २७ हजार १७५ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली.

दरम्यान महाराष्ट्रात काल दिवसभरात ४ हजार ५२४ रूग्ण कोरोनामधून बरे झाले, तर ४ हजार १५४ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्याचबरोबर ४४ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू देखील झाला. राज्यातील कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. शिवाय, तिसऱ्या लाटेचा शक्यता देखील वर्तवली जात आहे. राज्यात अद्यापही दररोज नवीन कोरोनाबाधित आढळून येत असून, कोरोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. तर, दररोज आढळणारी कोरोनाबाधितांची संख्या ही कोरोनातून बरे होत असलेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे.

आजपर्यंत राज्यात एकूण ६२,९९,७६० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०५ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,९१,१७९ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १३८०६१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.