तालिबानाच पुन्हा एकदा महिलांसंदर्भात धक्कादायक फतवा


काबूल – अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबान अनेक फतवे काढत आहे. तालिबानची महिलांसंदर्भातील भूमिका नेहमी संशयास्पद राहिली आहे. यापुर्वी तालिबाने अनेक महिलांवर अत्याचार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तालिबान्यांनी काबूलमध्ये पाकिस्तान विरोधात आंदोलन करणाऱ्या महिलांवर हवेत गोळीबार केल्याची घटना देखील घडली होती. तालिबानने यापुर्वी अफगाण महिलांना क्रिकेट सहित अन्य खेळांमध्ये भाग घेण्यावर बंदी घातली होती. दरम्यान, तालिबानने पुन्हा एकदा महिलांसंदर्भात धक्कादायक निर्णय घेतला आहे.

मुलाखतीदरम्यान तालिबान प्रवक्त्याने सांगितले की, अफगाणिस्तानील कोणताही महिला मंत्री होऊ शकत नाहीत, त्यांनी फक्त मुलांना जन्म द्यावा. नवीन अफगाणिस्तान सरकारमध्ये महिलांचा समावेश न करण्याबाबत टोलो न्यूजवर तालिबानचे प्रवक्ते सय्यद जकारुल्लाह हाशिमी यांनी वक्तव्य केल्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

तालिबान राजवटीत अफगाणिस्तानमध्ये महिलांना प्रवासास, घराबाहेर पडण्यास बंदी आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांना कमी लेखले जाते. तेथे महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत जागतिक महिला आयोगाने देखील चिंता व्यक्त केली आहे. महिलांचे स्वतंत्र नष्ट करणारा आणखी एक निर्णय तालिबानने घेतला आहे.

सय्यद जकारुल्लाह हाशिमी म्हणाला, अफगाणिस्तानातील एक महिला मंत्री होऊ शकत नाही, हे असे होईल की तुम्ही त्यांच्या गळ्यात काहीतरी टाकले, जे त्या घेऊ शकत नाहीत. महिलांचे मंत्रिमंडळात असणे आवश्यक नाही. त्यांनी मुलांना जन्म द्यावा. तसेच अफगाणिस्तानातील महिला आंदोलक देशातील सर्व महिलांचे प्रतिनिधित्व करू शकत नाहीत.

महिला समाजाचा अर्धा भाग आहे, या प्रश्नावर हाशिम म्हणाला, पण त्यांना आमच्यातील आम्ही अर्धा भाग मानत नाही. अर्धा प्रकार काय असतो? अर्ध्याची व्याख्याच चुकीची आहे. अर्ध्याचा अर्थ तुम्ही त्यांना मंत्रिमंडळात ठेवता एवढाच होता. तसेच जर तुम्ही त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन केले तर, काही विशेष फरक पडत नाही. गेल्या २० वर्षांमध्ये अमेरिका आणि अफगाणिस्तानमधील सरकारबरोबरच येथील माध्यमांनी जे काही म्हटले आहे, त्याला कार्यालयांमध्ये वेश्याव्यवसायाशिवाय इतर कसली उपमा देता येईल?

मुलाखतकाराने हाशिमच्या उत्तरावर आक्षेप घेत तुम्ही महिलांवर वेश्याव्यवसायाचा आरोप करू शकत नसल्याचे म्हटले यावर हाशिम म्हणाला, सर्व अफगाणी महिलांवर मला आरोप करायचा नाही. अफगाणिस्तानमध्ये चार महिला रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत, त्या अफगाणिस्तानच्या महिलांचे प्रतिनिधित्व करु शकत नाहीत. अफगाणिस्तानच्या महिला त्या आहेत, ज्या मुलांना जन्न देतात. त्यांना इस्लामिक नैतिकतेबद्दल शिक्षण देतात.