पाचवा कसोटी सामना दोन दिवस पुढे ढकलला


मॅन्चेस्टर – मॅन्चेस्टर येथे ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दोन दिवसांचा खेळ स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून हा सामना दोन दिवस पुढे ढकलत असल्याची घोषणा इंग्लंड अॅन्ड वेल्स क्रिकेट बोर्डने केली आहे. रविवारी हा सामना जर खेळवण्यात आला नाही, तर हा सामना रद्द करण्यात येणार असल्याचेही इंग्लंड अॅन्ड वेल्स क्रिकेट बोर्डने स्पष्ट केले आहे.

त्याचबरोबर इंग्लंड अॅन्ड वेल्स क्रिकेट बोर्डाने असे देखील म्हटले आहे की, सध्याची स्थिती पाहता सामन्याच्या पहिल्या दोन दिवसांचा खेळ स्थगित करण्यात येत असून या सामन्याची सुरुवात आता रविवारी होईल. हा सामना जर रविवारी खेळवण्यात आला नाही, तर हा सामना रद्द करण्यात येईल.

भारतीय संघाचे सहाय्यक फिजियो परमार यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर भारतीय संघाचा सराव रद्द करण्यात आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व भारतीय खेळाडूंची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून त्यांना हॉटेलमध्ये आयसोलेट करण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाचे प्रमुख सौरव गांगुली गुरुवारी यावर बोलताना म्हणाले होते की, पाचवा कसोटी सामना होईल की नाही या बाबत शंका आहे. हा सामना होण्याची शक्यता फारच कमी आहे.