पुणे महानगरपालिकेत अभियंता पदांसाठी नोकर भरती


पुणे : नवी दिल्ली -कोरोना संकटामुळे आपल्यापैकी अनेकजणांनी आपला रोजगार गमावलेला असल्यामुळे अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. पण यासाठी कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीअभावी ही संधी हुकते. त्यामुळेच कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न माझा पेपरने सुरु केला आहे. जेणेकरुन ज्यांना रोजगाराची गरज आहे, ते उमेदवार त्याठिकाणी अर्ज करु शकतील.

दरम्यान नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी आता आणखीन एक नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या इंजिनिअर्सना पुणे महानगरपालिकेमध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. ही भरती महानगरपालिकेतील १० जागांसाठी होणार असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

ही भरती डेटाबेस अभियंता, डेटाबेस प्रशासक, सॉफ्टवेअर अभियंता, वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता, मोबाइल अँप विकसक, कर संकलन आणि समेट या पदांसाठी आहे. पात्र उमेदवारांनी या पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ सप्टेंबर २०२१ असणार आहे.

या पदांसाठी भरती

  • डेटाबेस अभियंता
  • डेटाबेस प्रशासक
  • सॉफ्टवेअर अभियंता
  • वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता
  • मोबाइल अॅप विकसक
  • कर संकलन
  • समेट

पात्रता आणि अनुभव

  • डेटाबेस अभियंता – बीई (संगणक IT/संगणक मध्ये पदव्युत्तर)
  • डेटाबेस प्रशासक – बीई (संगणक IT/संगणक मध्ये पदव्युत्तर)
  • सॉफ्टवेअर अभियंता – बीई (संगणक IT/संगणक मध्ये पदव्युत्तर)
  • वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंतामोबाइल – बीई (संगणक IT/संगणक मध्ये पदव्युत्तर)
  • अँप विकसक – बीई (संगणक IT/संगणक मध्ये पदव्युत्तर)
  • कर संकलन – बीई (संगणक IT/संगणक मध्ये पदव्युत्तर)
  • समेट – बीकॉम/ एमबीए

अर्ज पाठवण्याचे ठिकाण – मुख्य इमारत, कर आकारणी व कर संकलन कार्यालय, पुणे.