एकदा चार्ज केल्यावर 181 किमी धावणारी Olaची इलेक्ट्रिक स्कूटर बाजारपेठेत दाखल


मुंबई: खाजगी टॅक्सी सेवा पुरवणारी कंपनी ओलाने आपल्या ग्राहकांच्या फायद्यासाठी अनेक खास सुविधा आणल्या आहेत. ओलाने नुकतीच बाजारात आपली ई-स्कूटर लाँच केली. नागरिकांना वापरायला ही स्कूटर कधी मिळणार याची उत्सुकता होती. अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. याबाबतची माहिती नुकतीच ओलाने दिली. ओला कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर (OLA e-scooter) आज पासून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. ही स्कूटर ओला कंपनीने ग्राहकांसाठी 2 व्हेरिएंटमध्ये लॉन्च केली आहे.

पहिली S1 आणि दुसरी S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर. तरूणांसाठी आणि इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी ही स्कूटर फायद्याची ठरणार आहे. या ई-स्कूटरची खासियत आणि किंमत याबाबतची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

तुम्ही ही ई-स्कूटर ओला कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन थेट बुक करू शकता. पण स्कूटरची डिलिव्हरी ही ऑक्टोबर 2021 पासून सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, ओला कंपनी ग्राहकांना टेस्ट राइड देणार आहे. टेस्ट राइडनंतर तुम्ही ही ऑर्डर रद्दही करू शकता.

महाराष्ट्रात Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 99,999 रुपये एवढी, तर S1 Pro ची किंमत 1,29,999 रुपये एवढी आहे. ई-स्कूटर ही 10 रंगाच्या वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे, तुम्ही तुम्हाच्या आवडीनुसार स्कूटर बुक करू शकता.

ऑर्टिफिशियल साउंड सिस्टम, 4G कनेक्टिविटी सिस्टम त्यासोबतच तुम्ही तुमचा स्मार्टफोन सुद्घा या स्कूटरमध्ये कनेक्ट करू शकता. ‘Hey Ola’ बोल्यावर ही ई-स्कूटर तुमचे सगळे काही ऐकणार आहे. ola इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3.9 kWh क्षमतेचा बैटरी असणार आहे. ज्यामुळे तुम्ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये 181 किलोमीटर चालवू शकता.