असे आहे गणेशाचे कुटुंब

ganesh
भारतभर आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. मनोकामना पूर्ण करणारा अणि विघ्नहर्ता गणेश याच्या विषयी आपल्याला बरेच कांही माहिती असते मात्र गणेशाच्या कुटुंबाबाबत मात्र फारशी माहिती नसते. शिवपार्वतीचा पुत्र गणेश याच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य पूजनीय आहे आणि भाविकाच्या मनोकामना पूर्ण करणारे असे हे कुटुंब आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे आगळे महत्त्वही आहे.

गणेशपिता भगवान हा देवांचा देव महादेव आहे. तो महाकालही आहे. स्वभावाने अत्यंत भोळा असलेला महादेव सहज प्रसन्न होणारा देव मानला जातो. गणेश माता पार्वती ही जगदंबा आहे. हिमालय व मैना यांची मुलगी पार्वती हिलाच दुर्गा म्हणूनही पुजले जाते. ती शक्ती आहे. शरीरात शक्ती नसेल तर शरीर बेकार होते. शक्ती म्हणजे तेजाचा पुंज. पार्वती म्हणजेच दुर्गेची पूजा भाविकाला त्याच्या इच्छीत कामात सफलता देते. अर्धनारीश्वराचे रूप हे शक्तीचे महत्त्व विशद करणारे मानले जाते.

गणेशाचा भाऊ कार्तिकेय देवांचा सेनापती आहे. तो साहसाचे प्रतीक मानला जातो. अगदी लहान वयात तारकासुराचा वध करून त्याने त्याचा साहसीपणा सिद्ध केला होता. कार्तिकेयेच्या पुजनाने भाविकाला आत्मबल व आत्मविश्वासाची प्राप्ती होते. शिवपुराणात कार्तिकेय ब्रह्मचारी आहे तर अन्य पुराणात तो विवाहित असून त्याच्या पत्नीचे नांव आहे देवसेना.

गणेशाच्या पत्नी रिद्धी आणि सिद्धी. शिवपुराणात प्रजापती विश्वरूपाच्या या कन्या आहेत.सिद्धी ज्ञानाची व मनोरथ पूर्ण करणारी सफलता देणारी देवता. शारदा म्हणचे सरस्वती हिलाची गणेशाची पत्नी मानले गेले असून ती बुद्धी देणारी देवता आह. गणेशाचे पुत्र क्षेम आणि लाभ असे आहेत. क्षेम हा पुण्य,धन, ज्ञान व ख्याती सुरक्षित ठेवतो. पुरषार्थाने कमावलेल्या कोणत्याही गोष्टीचा क्षय होऊ देत नाही. लाभ हा धन आणि यश देतानाच त्याची वृध्दी करण्यासाठी पुजला जातो.

Leave a Comment