आले आले गणराज


आज गणेशचतुर्थीचा दिवस. कोणत्याही शुभकार्याची सुरवात करताना प्रथम गणेश पूजन केले जाते. गणपती हा फक्त हिंदू किंवा भारतीयांचा देव नाही तर तो जागतिक देव किंवा ग्लोबल गॉड असून जगाच्या पाठीवर अनेक देशात पुजला जाणारा देव आहे. प्रत्येक देशतील गणेश पूजा परंपरा वेगळी असेल पण तो बुद्धिदाता आहे हा समज सर्वत्र मान्य केला गेला आहे.

sukicon
ऑक्सफर्ड न्यूज एजन्सी तर्फे प्रसिद्ध झालेल्या माहितीत गणेश प्राचीन काळापासून मध्य आशियासह जगातील अनेक देशात पुजला जात आहे. वैदिक समजुतीनुसार गणेश १० हजार वर्षापूर्वी प्रकट झाला आहे. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली या सॉफटवेअर उद्योग राज्यात त्याला सायबरस्पेस टेक्नोलॉजीची देवता मानले गेले आहे. तो बुद्धिदाता आहे आणि त्याचे वाहन आहे उंदीर. सॉफटवेअर अबियान्ते माउसचा वापर करूनच त्यांच्या अनके कल्पना मूर्त स्वरुपात आणतात. तेथेही गणेश मंदिर आहे.

thail
जपान मध्ये गणेशाची २५० हून अधिक मंदिरे आहेत आणि तेथे तो कंजोतेन नावाने पुजला जातो. जपान मध्ये गणेशाला भाग्य आणि सुखसमृद्धीची देवता मानले जाते. थायलंड मध्ये गणेश पूजा भारतीय पद्धतीने केली जाते आणि याच देशात १२८ फुट उंचीची भव्य गणेश प्रतिमा पाहायला मिळते. युरोप मधील अनेक देशात उद्योजक, लेखक कलाकार त्याच्या घरात, कार्यालयात गणपतीचा फोटो लावतात. रोमन लोकही गणेश पूजा करून कामाला प्रारंभ करतात तर आयरिश लोकांच्या मते हि देवता भाग्याची देवता आहे. दिल्ली येथील आयर्लंडच्या दूतावास प्रवेशद्वारावर गणेश मूर्ती असून अश्या प्रकारचा हा पहिलाच दूतावास आहे.

japani
गणेशाचे फोटो युके, जर्मनी, फ्रांस, स्वित्झर्लंड या देशात दिसतात. अफगाणिस्तान, इराण, म्यानमार, नेपाल, थायलंड, लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम, चीन, जपान, मंगोलिया, इंडोनेशिया, बल्गेरिया, ब्रुनेई, मेक्सिको येथेही गणेश मूर्ती सापडल्या आहेत. ग्रीक नाण्यावरही गणेश प्रतिमा सापडल्या आहेत. इंडोनेशियाचा चलनी नोटेवर गणेश बाप्पा आहेत.

Leave a Comment