परमबीर सिंह यांनी सिक्रेट सर्व्हिस फंडातून सायबर एक्सपर्टला दिले 5 लाख


मुंबई : एजन्सीमधील एका सायबर एक्सपर्टने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) दाखल केलेल्या एका चार्जशीटमध्ये एक धक्कादायक माहिती दिली आहे. अॅंटिलिया कांड प्रकरणाची दिशाभूल करण्यासाठी माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी जैश उल हिन्द नावाच्या दहशतवादी संघटनेशी संबंधिक अहवालात छेडछाड केल्याचा दावा एक्सपर्टने केला आहे. यासाठी सायबर एक्सपर्टला पाच लाखांची लाच परमबीर सिंह यांनी दिल्याचेही त्यानं सांगितले आहे. या दाव्याची पडताळणी करण्यासाठी परमबीर सिंह यांच्या अत्यंत जवळच्या अधिकाऱ्याचा जबाब देखील घेण्यात आला. या गोष्टीला त्या अधिकाऱ्याने देखील दुजोरा दिला आहे की, परमबीर सिंह यांच्या सांगण्यावरुन सिक्रेट सर्व्हिस फंडातून त्याने 5 लाख रुपए काढून सायबर एक्सपर्टला दिले होते.

ही गोष्ट ज्या अधिकाऱ्याने कबूल केली आहे, तो अधिकारी मागील दहा वर्षांपासून परमबीर सिंह यांच्यासोबत काम करत आहे. सध्या होम गार्ड विभागात हा अधिकारी पोस्टेड आहे. परमबीर सिंह देखील याच ठिकाणी डीजी आहेत. परमबीर सिंह हे 2006 साली एटीएसमध्ये होते, तेव्हापासून सदर अधिकारी त्यांच्यासोबत आहे. परमबीर सिंह 2006 नंतर कोकण रेंजचे आयजी झाल्यानंतर व्हिआयपी सिक्युरिटीमध्ये गेले, त्यानंतर एडीजी/एसआरपीएफ, ठाणे पोलिस आयुक्त, एडीजी लॉ अँड ऑर्डर (महाराष्ट्र) तसेच डीजी एसीबी आणि नंतर ते मुंबई पुलिस आयुक्त झाले आणि आता ते डीजी होमगार्ड पदावर आहेत. या प्रत्येक ठिकाणी हा अधिकारी परमबीर सिंहांच्या सोबत राहिला होता.