कर्जाची परतफेड न केल्यामुळे नारायण राणेंच्या पत्नी आणि मुलाविरोधात लुकआऊट नोटीस जारी


पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पत्नी नीलम राणे आणि मुलगा नितेश राणेंविरुद्ध पुणे पोलिसांकडून लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. ही कारवाई DHFL कडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे न्यायालयाच्या आदेशावरुन करण्यात आली आहे.

आर्टलाईन प्रॉपर्टीड प्रायव्हेट लिमिटेडने 25 कोटींचे कर्ज घेतले होते. आर्टलाईन प्रॉपर्टीज कंपनीच्या नीलम राणे सहअर्जदार आहेत. या 25 कोटीच्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे लुकआऊट नोटी जारी करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी ही कारवाई डीएचएफएल कंपनीने केलेल्या तक्रारीनंतर केली आहे.