संजय दत्तने मानले नितीन गडकरी यांच्यासोबतचा फोटो शेअर करत मानले आभार


बॉलीवूडचा मुन्नाभाई अर्थात अभिनेता संजय दत्तने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप उमटवली आहे. सोशल मीडियावर संजय दत्त प्रचंड सक्रिय असतो. त्याचे फोटो आणि व्हिडीओ तो सतत चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतो. संजय दत्तने नुकताच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत फोटो शेअर करत त्यांचे आभार मानले आहेत.


आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर संजय दत्तने नितीन गडकरी यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने, मी स्वत:ला भाग्यवान मानतो कारण तुम्ही मला गेल्या काही वर्षांपासून पाठिंबा दिला आहे. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूमध्ये तुम्ही मला पाठिंबा दिला आहे आणि मी ते कधीही विसरु शकणार नाही. नितीन गडकरी सर, तुम्ही केलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी खूप खूप धन्यवाद, या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

त्याने कॅप्शनमध्ये पुढे जय पटेलचे देखील आभार मानले आहेत. जय पटेल, तू मला माझ्या आयुष्याची प्रत्येक पायरी चढताना पाठिंबा दिला आणि माझा आधारस्तंभ झाल्याबद्दल धन्यवाद, असे कॅप्शन दिले आहे.