UIDAI मध्ये ‘या’ पदांसाठी नोकरभरती


नवी दिल्ली -कोरोना संकटामुळे आपल्यापैकी अनेकजणांनी आपला रोजगार गमावलेला असल्यामुळे अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. पण यासाठी कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीअभावी ही संधी हुकते. त्यामुळेच कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न माझा पेपरने सुरु केला आहे. जेणेकरुन ज्यांना रोजगाराची गरज आहे, ते उमेदवार त्याठिकाणी अर्ज करु शकतील.

दरम्यान नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी आता आणखीन एक नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. खासगी सचिव आणि इतर पदांसाठी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया, UIDAI ने उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे पात्र उमेदवार UIDAI च्या अधिकृत वेबसाइट uidai.gov.in वर ऑनलाइन अर्ज भरू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ सप्टेंबर २०२१ आहे.

१५ पदे या भरती प्रक्रियेद्वारे भरली जातील. खाली नमूद केलेल्या पदांची भरती विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये नियुक्तीसाठी योग्य आणि पात्र अधिकाऱ्यांमधून प्रतिनियुक्ती (परराष्ट्र सेवा tesm) आधारावर केली जाईल. पात्रता, निवड प्रक्रियेसह संपूर्ण तपशील खाली दिले आहेत. अधिसूचनेनुसार, चंदीगड, दिल्ली, मुंबई, हैदराबाद, लखनऊ आणि रांची येथील प्रादेशिक कार्यालयांमध्ये पदांसाठी यूआयडीएआय उमेदवारांची भरती करेल.

प्रत्येक स्थानावर अधिकृत सूचना अर्ज संबंधित पत्त्यावर उमेदवारांनी भरलेले अर्ज पाठवावे. अधिक संबंधित तपशीलांसाठी उमेदवार UIDAI ची अधिकृत वेबसाइटवर जाऊन पाहू शकता. . वेगवेगळ्या पदांसाठी पात्रता वेगळी आहे. ज्या उमेदवारांना पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी या पदासाठी अर्ज करण्याची पात्रता काय आहे हे जाणून घेण्यासाठी या लिंक वर करा.

या पदांसाठी आहे भरती

  • खाजगी सचिवाची ७ पदे
  • उपसंचालकांची ३ पदे
  • सेक्शन ऑफिसरची ३ पदे
  • सहाय्यक लेखा अधिकाऱ्यांची २ पदे

यूआयडीएआयने आपल्या नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे की इच्छुक उमेदवार त्यांचे अर्ज निर्धारित प्रोफार्मामध्ये भरून ते त्यांच्या संबंधित क्षेत्रीय कार्यालयाच्या एडीजीकडे (एचआर) पाठवू शकतात. तसेच, उमेदवार UIDAI ची अधिकृत वेबसाइट http://www.uidai.gov.in ला भेट देऊ शकतात. अर्ज आणि कसा करावा याबद्दलची सविस्तर देखील माहिती मिळवू शकतात.