पुरुषमंडळींना अनेकदा दाढी केल्यानंतर त्यांना त्रास होतो. पण दाढी करताना केलेल्या चुकांमुळे आपल्या हा त्रास होतो. अशाच प्रकारचा त्रास तुम्हालाही होत असेल तर तुमच्याकडून देखील अशाच काहीशा चुका होत असतील. त्याच चुकांबाबत आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.
जोपर्यंत दाढी करण्याच्या ब्लेडला धार आहे तोपर्यंत त्या ब्लेडचा वापर दाढी करण्यासाठी करता येऊ शकतो, असा आपल्यापैकी अनेकांचा समज असतो. पण ठराविक काळानंतर ब्लेड बदलण्याची गरज आहे. ब्लेड जर बदलले नाही तर त्वचेचे नुकसान होते. किटाणू जुन्या बेल्डवर जमा होतात तुमच्या त्वचेला जे इजा पोहोचवू शकतात.
शेविंग क्रीम जेव्हा तुम्ही विकत घ्याल, त्यावेळी त्यावर लिहिलेल्या सर्व गोष्टी काळजीपूर्वक वाचा. आपल्या त्वचेच्या पोतप्रमाणे शेविंग क्रिम निवडा. तुम्ही जर दररोज दाढी करता असाल तर तुमच्या त्वचेसाठी हे धोकादायक आहे. त्वचेशी निगडीत अनेक आजार तुम्हाला दररोज दाढी केल्याने होऊ शकतात. त्यामुळे दाढीचे केस योग्य वाढल्यानंतरच शेविंग करा.
दाढी करताना अनेकजण पूर्ण ताकद लावतात. असे करणे चुकीचे आहे. केस जोर लावल्याने मुळापासून निघतील असा काहींचा समज असतो, पण असे काहीही होत नाही. याउलट दाढी करताना जोर दिल्यास चेहऱ्यावर व्रण उठू शकतात. ज्यामुळे चेहऱ्याला सतत खाज येऊ शकते.
थंड पाण्याचा वापर दाढी करताना करू नका. त्वचा यामुळे जास्त कठीण होऊ शकते आणि नंतर दाढी करताना अजून त्रास होऊ शकतो. ब्लेडमुळे त्वचेला इजा होण्याचाही धोका असतो. त्यामुळे दाढी करताना शक्यतो कोमट पाण्याचा वापर करावा.