सध्या आपण डिजीटल युगात वावरत असून आपल्यापैकी प्रत्येकजणांच्या हातात या डिजीटल युगाचा एक पुरावा आपल्याला हमखास पाहिला मिळतो. तो म्हणजे आपला स्मार्टफोन… प्रत्येकाच्या हातात हा स्मार्टफोन असल्यामुळे सगळी माहिती इंटरनेटमुळे चुटकीसुरशी मिळून जाते. पण या इंटरनेटच्या विळख्यात 18 वर्षांहून कमी वयाची मुले पूर्णतः अडकली आहेत. याच वयातील मुले त्यांचा सर्वात जास्त वेळ पॉर्न पाहण्यात घालवतात. त्यांना अर्धवट माहितीमुळे यासंबंधी अपूर्ण ज्ञान मिळते. आपण जे पाहिले तेच योग्य असल्याचा त्यांचा समज होतो.
पॉर्न पाहण्यापूर्वी युवकांना त्यांचे वय सांगणे ब्रिटन सरकारने बंधनकारक केले आहे. ब्रिटनमध्ये हा कायदा 15 जुलैपासून लागू करण्यात आला. ब्रिटन हा असा आदेश देशारा जगातील पहिला देश झाला आहे. आता आज आम्ही तुम्हाला ऑनलाइन पॉर्न पाहिल्यावर मनुष्याच्या मेंदूवर काय परिणाम होतो याची माहिती सांगणार आहोत.
यासंदर्भात मेडिकल डेलीने दिलेल्या रिपोर्टनुसार, याबद्दल एका रिसर्चमध्ये स्पष्ट सांगण्यात आले आहे की, पॉर्न जे पाहतात त्यांच्या डोक्यात यासंबंधी अनेक नवीन विचार येत असतात. असे चित्रपट पाहिल्यानंतर dopamine हार्मोन अर्थात सेक्स ड्राइव्हला उत्तेजन मिळते. न्यूरो ट्रान्समीटरप्रमाणे हे काम करते. यामुळे व्यक्तिला आनंद मिळतो आणि शरीरसंबंधांकडे त्याचे मन वळते.
2014 मध्ये झालेल्या एका संशोधनानुसार, नियमितप्रमाणात एखादी व्यक्ती पॉर्न पाहते तर एक अशी वेळ येते तेव्हा त्याची सेक्ससंबंधी रुची कमी होते. 2011 मध्ये झालेल्या अजून एका संशोधनात म्हटले आहे की, लग्नानंतरचा सुरुवातीचा काळ पॉर्न पाहणारी युवा पिढी एन्जॉय करू शकत नाही. पार्टनरसोबतचे अशांचे संबंधही फार चांगले राहू शकत नाहीत.
मेंदूच्या striatum भागावर पॉर्न पाहिल्यामुळे विपरित परिणाम होतो. striatum पॉर्न पाहिल्यामुळे आकुंचन पावते आणि काम करण्याची त्याची शक्तीही कमी होते. लोकांना प्रेरणा देण्याचे काम मेंदूचा हा भाग करतो. ब्रिटनच्या डिजिटल विभागाचे मंत्री मार्गट जेम्स ऑनलाइन पॉर्नवर बंदी आणल्यानंतर म्हणाले की, सध्या सर्वांसाठीच इंटरनेटचा वापर फार सोपा झाला आहे. जगातील पहिला असा देश आम्ही असू जिथे ऑनलाइन पॉर्न पाहण्यासाठी आता वय सांगावे लागेल.
तसले चित्रपट पाहण्याआधी दहावेळा विचार करा
Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही