या अनोख्या गावात केवळ मुलीच येतात जन्माला


तुम्ही कधी अशा गावाबद्दल ऐकले आहे का जेथे केवळ मुलीच जन्माला येतात ? पोलंड आणि चेक रिपब्लिकच्या सीमेवर असेच एक अनोखे गाव आहे. या गावात केवळ मुलीच जन्माला येतात. या गावात मागील 9 वर्षांपासून मुलगा जन्मालाच आलेला नाही.

या गावाचे नाव मिजेस्के ओद्रजेनस्की आहे. येथे 2010 मध्ये शेवटचा मुलगा जन्माला आला होता. मात्र त्यानंतर तो मुलगा आणि त्याचे कुटूंब गाव सोडून निघून गेले. या गावाची लोकसंख्या 300 आहे. यामध्ये मुली आणि महिलांचीच संख्या जास्त आहे.

या गावातील सर्वात लहान मुलगा 12 वर्षांचा आहे. येथील महापौर रेजमंड फ्रिशको यांनी जाहीर केले आहे की, ज्या घरात मुलाचा जन्म होईल, त्यांना बक्षीस देण्यात येईल.

गावकऱ्यांनुसार, केवळ मुलीच जन्म घेतात याचे कारण त्यांनाही माहित नाही. मात्र पोलंडची राजधानी वारसॉतील एका विश्व विद्यालयाने यामागचे कारण जाणून घेण्यासाठी संशोधन सुरू केले आहे.

वारसॉची मेडिकल युनिवर्सिटीचे प्रोफेसर रफाल प्लोस्की यांचे म्हणणे आहे की, गावामध्ये मुलगा जन्माला येत नाही ही, अनोखी घटना तर आहेच पण त्याचबरोबर चिंतेची बाब देखील आहे. त्यांचे म्हणणे आहे की, यामागचे कारण शोधणे अवघड आहे. यासाठी गावाचे मागील सर्व रेकॉर्डस तपासावे लागतील. तसेच मुलींच्या आईवडिलांचे मागील काही संबंध तर नाहीत, ते लांबचे नातेवाईक तर नाहीत हे देखील तपासणे गरजेचे आहे.

Leave a Comment