तुमच्या आवडत्या पाणीपुरीबद्दल आहेत का या गोष्टी माहिती ?


पाणीपुरीचे नाव काढले की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. हा असा एक स्ट्रीट फूड आहे की, कोणीही कधीही खावू शकते. पाणीपुरीने केवळ मनच नाही तर पोट देखील भरते. त्यामुळेच पाणीपुरीच्या स्टॉलसमोर आपल्याला नेहमीच गर्दी पाहायला मिळते. भारतातील प्रत्येक भागात पाणीपुरी प्रसिध्द आहे. मात्र तुम्हाला पाणीपुरीची सुरूवात कशी झाली माहितीये का ? आज आम्ही तुमच्यासाठी पाणीपुरीशी संबंधित अशाच काही गोष्टी घेऊन आलो आहोत, ज्या तुम्ही याआधी कधीही ऐकल्या अथवा वाचल्या नसतील.

पाणीपुरीची अनेक नावे –
पाणीपुरी हे एक असे फूड आहे, जे वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. दिल्लीमध्ये पाणीपुरीला ‘गोलगप्पे’ म्हणतात. तर उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये ‘पाणी बताशे’ नावाने ओळखले जाते. महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये ‘पाणीपुरी’ म्हटले जाते. तर पश्चिम बंगालमध्ये ‘पुचका’ असे म्हटले जाते. मध्यप्रदेशमध्ये ‘फुलकी’, ओडिसा, झारखंड आणि बिहारमध्ये ‘गुपचूप’ नावाने ओळखले जाते. एकाच देशात पाणीपुरीला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. पाणीपुरी बनवण्याची पध्दत देखील प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आहे. लखनऊमध्ये तर पाच वेगवेगळ्या प्रकारची पाणीपुरी बनते.

द्रोपदीच्या काळापासून प्रसिध्द आहे पाणीपुरी –
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, मात्र अशीही पाणीपुरीशी संबंधित दोप्रदी आणि कुंती यांच्याशी संबंधित कथा प्रसिध्द आहे. सांगण्यात येते की, कुंतीने द्रोपदीला असे जेवण बनवायला सांगितले की, ज्याने सर्वांचे पोट भरेल. तेव्हा द्रोपदीने सर्वांसाठी पाणीपुरी बनवली होती. पाणीपुरी खाऊन पांडव आणि कुंती खुष झाले होते. त्याचबरोबर कुंतीने द्रोपदीने केलेल्या कामासाठी तिला वरदान देखील दिले होते.

शाहजहांची मुलगी रोशनआराबरोबर पाणीपुरीचा संबंध –
सांगण्यात येते की, सर्वात प्रथम पाणीपुरी ही शाहजहांची मुलगी रोशनआराने बनवले होते. दिल्लीच्या एका कालव्याचे पाणी पुर्ण दिल्ली वापरत असे, ती नदी खराब होत चालली होती. ज्यामुळे दिल्लीकरांना त्रास होऊ लागला होता. लोकांचे पोट खराब होऊ लागले. अशावेळी रोशनआराने अशी वस्तू तयार करण्यास सांगितली जी सहज खाता येऊ शकेल. तेव्हा पाणीपुरी तयार करण्यात आली. तेव्हापासूनच दिल्लीमध्ये पाणीपुरी प्रसिध्द आहे.

पाणीपुरीचे फायदे –
तुम्हाला माहिती नसेल, पण पाणीपुरी खाण्याचे देखील फायदे आहेत. पाणीपुरी खाताना नेहमी लक्षात ठेवा की, ते स्वच्छ पाण्याने बनलेले असावे. बाहेर स्टॉलवर विकल्या जाणाऱ्या पाणीपुरीत भेसळ असते, अस्वच्छता असते.पाणीपुरीमुळे तुमचे पोटाचे आजार दूर होऊ शकतात. पाणीपुरीच्या पाण्यामध्ये असलेली पुदीन्याची चटणी, कोथिंबीर, हिरवी मिर्ची, जिरे, हिंग आणि काळे मीठ तुमची पचनक्रिया व्यवस्थित करते. त्यामुळेच पाणीपुरी खाल्याने पोटाच्या समस्या दूर होतात.

Leave a Comment