भारतीय जवानांना आकर्षित करण्यासाठी पाकमधील या ठिकाणी भरते हनी ट्रॅपची शाळा


चीन आणि पाकिस्तानच्या इंटेलीजेंस एजेंसीकडून भारतीय सैन्याच्या जवानांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी मोठी तयारी करण्यात येत आहे. यातून वाचण्यासाठी जवानांना ट्रेनिंग देखील दिली जात आहे. सैन्य आणि अर्धसैन्य दलामध्ये रोज रॉल कॉलच्या दरम्यान जवानांना हनी ट्रॅपबद्दल माहिती दिली जात आहे.

काही दिवसांपुर्वीच एक रिपोर्ट आला होती की, आता सैन्यानंतर अर्धसैनिक दलावर हनी ट्रॅपचा धोका आहे. गोपनीय माहिती लीक करण्यासाठी दोन्ही देशांनी मोठ्या प्रमाणात महिला एजेंटची भर्ती करण्यास सुरूवात केली आहे. भारतीय एजेंसीने माहिती मिळाली आहे की, या दोन्ही देशाने फेसबूक, ऑरकूट व इंस्टाग्रामच्या मदतीने सैन्य व अर्धसैन्य दलाच्या जवानांचे मोबाईल नंबर जमा केले आहेत.

आता जिन्ना महिला युनिवर्सिटीच्या साईटवर सोशल मीडिया स्पेशलिस्ट (महिला) साठी नोकरीची जाहिरात काढण्यात आली आहे. वेबसाईटवरील जाहिरातीनुसार,  ही नोकरी सैन्याच्या एका मीडिया हाऊससाठी आहे. जाहिरातीमध्ये सांगण्यात आले आहे की, उमेदवाराला सोशल मीडिया मार्केटिंग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव पाहिजे. त्याचबरोबर टायपिंग, फोटो-व्हिडीओ आणि टेक्स्ट एडिटिंग आणि प्रेजेंटेशन येणे गरजेचे आहे. तसेच उमेदवाराचे संभाषण देखील चांगले असणे गरचेचे आहे. सोशल मीडिया स्पेशलिस्ट या पदासाठी इंग्रजी येणाऱ्याला प्राथमिकता देण्यात येईल. या जाहिरातीसंबंधी देखील प्रश्न उपस्थित केले जात असून, ही जाहिरात हनी ट्रॅपसाठी तर नाही ? असे विचारले जात आहे.

सैन्याच्या अर्धसैनिक दलांच्या अधिकाऱ्यावर हनी ट्रॅपचा धोका आहे. गोपनीय माहिती लीक करण्यासाठी या दोन्ही देशांनी आधी एजेंटला शहरापर्यंतच मर्यादित ठेवले होते. मात्र आता त्यांनी इतर भागासाठी देखील महिला एजेंटची भर्ती करण्यास सुरूवात केली आहे. भारतीय सुरक्षा एजेंसीना माहिती मिळाली आहे की, सोशल मीडिया साईटद्वारे सैन्य व अर्धसैन्य दलांच्या अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर जमा करण्यात आले आहेत. जवानांना खाजगी नंबरवरून महिलांचे फोन येत आहेत. सैन्य आणि अर्धसैन्य दलामध्ये ‘वेपन इन मोबाईल आउट’ ही पॉलिसी देखील यशस्वी झालेली नाही.

Leave a Comment