भाजल्याची खूण घालवण्यासाठी आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी तयार केली खास पट्टी


आयआयटी दिल्लीच्या तीन विद्यार्थ्यांनी अशी पट्टी बनवली आहे, जी जळाल्याची खूण पुसून टाकते. या पट्टीचा वापर सेंकड डिग्री बर्न इंजरीसाठी केला जाऊ शकतो. म्हणजेच अशा जख्मा ज्या गंभीर असतात व त्वचेच्या खालपर्यंत होतात, त्यासाठी वापरता येणार आहे.

या पट्टीला आराधना, कीर्तिका आणि गोपेंद्र यांनी प्रोफेसरबरोबर मिळून बनवले आहे. विद्यार्थी आणि प्रोफेसरचा दावा आहे की, या पट्टीमध्ये खूप कमी वेळात जख्म भरली जाते. वैशिष्ट म्हणजे यापट्टीमुळे जळाल्याची खूण देखील राहत नाही. या पट्टीचे यशस्वी परीक्षण एम्सबरोबर मिळून करण्यात आलेले आहे.

रिपोर्टनुसार, यासारख्या पट्ट्या अमेरिका सारख्या देशात आधीपासूनच मिळत आहेत. तेथे याची किंमत 50 हजार रूपयांपर्यंत आहे. तर भारतात या पट्ट्यांची किंमत 500 ते 1000 च्या मध्ये आहे.

मेडिकल जर्नलमध्ये आलेल्या आकड्यांनुसार, देशात दरवर्षी 60-70 लाख लोकांना भाजल्यामुळे इजा होते. भाजल्यावर डाग पडतात व ते डाग घालवण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. मात्र ते डाग जात नाहीत. आता या डागांवर ही पट्टी फायदेशीर ठरणार आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment